शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

उत्पन्न सोडाच; लागवडीचा निम्मा खर्चही निघेना

By admin | Updated: December 2, 2014 00:45 IST

संतोष धारासूरकर , जालना दुष्काळपाठोपाठ गारपिटीचा मोठा तडाखा सहन केलेल्या या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यावर्षी म्हणजे यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे

संतोष धारासूरकर , जालनादुष्काळपाठोपाठ गारपिटीचा मोठा तडाखा सहन केलेल्या या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना सलग तिसऱ्यावर्षी म्हणजे यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे सोयाबीन या प्रमुख पिकाच्या लागवडीसह फवारणी व काढणी पर्यंतचा निम्मा खर्च सुद्धा पदरात पडला नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.गेल्या चार सहा वर्षांपासून या जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. विशेषत: नगदी पीक म्हणूनच सोयाबीनकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. याही वर्षी सोयाबीनचे लागवड क्षेत्र लक्षणीय होते.जिल्ह्यात एक लाख ९ हजार २५६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली. ती सुद्धा मोठ्या उमेदीने. कारण गेल्या दोन वर्षापूवी आवर्षणामुळेच कोरडवाहू शेतकऱ्यांनी भीषण दुष्काळ अनुभवला. त्यापाठोपाठ गेल्यावर्षी गारपिटीच्या तडाख्याने शेतकरी कोलमडला. तिसऱ्या वर्षी म्हणजे यावर्षी त्या दोन वर्षांचा खर्चाचा ताळेबंद बसवू म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्यांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मोठ्या उमेदीने, सोयाबीनची लागवड केली. तत्पूर्वी बँकांकडून, खाजगी सावकारांकडून कर्ज उचलून महागड्या बी- बियाणांची खरेदी केली. पेरणीपूर्व मशागत, उन्हाळी पाळ्या, पेरणीपूर्व पाळी व प्रत्यक्ष पेरणीसाठीही मोठा खर्च केला. महागडी बी- बियाणे पाठोपाठ डीएपी खते, त्यापाठोपाठ तणनाशक, किडीच्या दोन- चार फवारण्या, दोन वेळा कोळपणी, तसेच तणनाशकांसाठी फवारणी व खुरपणीसाठीही पाण्यासारखा खर्च केला. तेथून लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा सर्वसाधारण प्रतिएकरी सर्व साधारण खर्च, उतारा व प्रति क्विंटल सोयाबीनला मिळणारा भाव याचा ताळेबंद सहजपणे पडताळ्यास या जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पदरात यावर्षी लागवडीपासून काढणीपर्यंतचा निम्मा खर्च सुद्धा पडला नाही, असै दुर्दैवी चित्र समोर आले आहे. अशा परिस्थतीतही शासनाकडून शेतकऱ्यांचा चेष्ठा सुरु आहे. वस्तूनिष्ठ आणेवारी ऐवजी अनेक ठिकाणी जुजबी कामे करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.४गेल्यावर्षी या जिल्ह्यात १ लाख ९ हजार ८१५ हेक्टर सोयाबीनचे लागवड क्षेत्र होते. प्रति हेक्टरी उतारा १५ ते १७ क्विंटल एवढा होता. यावर्षी क्षेत्र फारसे घटले नाही. परंतु उतारा प्रति हेक्टरी चार ते पाच क्विंटल एवढाच सर्वसाधारणपणे आला आहे. म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक प्रति हेक्टरी उताऱ्यात घट आली आहे. ४यावर्षी एकरी एका कट्टयापासून (५५ किलो) सर्व साधारणपणे तीन ते चार कट्ट्यांपर्यंत सोयाबीनचा उतारा आला आहे. तीन कट्टे म्हणजे सर्व साधारण दीड क्विंटल प्रति एकरी उत्पादनही आहे. जालनासह अन्यत्र मार्केट यार्डात सोयाबीनला सर्वसाधारणपणे ३२०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळतो आहे. एकूण प्रति हेक्टरी सर्वसाधारण ११ ते १२ हजार रुपये खर्च असताना शेतकऱ्यांच्या पदरात चार ते सहा हजार रुपयेच पडत आहेत. म्हणजे निम्मा खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. पेरणीपूर्व मशागत- (उन्हाळी पाळ्या दोन, पेरणीपूर्व पाळी एक व प्रत्यक्षपेरणी) - १५०० रुपये ४बियाणे खरेदी- एक बॅग(३० किलो) - २५०० रुपये४खते- डीएपी (बियांबरोबर खतपेरा) - १२५० रुपये४तणनाशक- (पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांत फवारणीसह) १००० रुपये४अळीसाठी फवारणी ( पहिल्या २५ दिवसांच्या आत) - ७०० ते ८०० रुपये४फवारणी (अळीसाठी दुसऱ्यांदा फुलोरा अवस्थेत)- १००० रुपये४फवारणी (शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत)- ७०० ते८०० रुपये४कोळपणी (फवारण्यानंतर सर्व साधारणपणे दोन वेळा) - ४०० ते ५०० रुपये४तणनाशक (यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे तणनाशकासाठी जादा खुरपणी करावी लागली) - १२०० रुपये४काढणी प्रति एकरी - १९०० ते २२०० रुपये४मळणीयंत्र- ७० ते १०० रुपये कट्टयाप्रमाणे खर्च