ताडकळस पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आहे़ सध्या पाऊस पडत असल्याने ही इमारत जागोजागी गळू लागली आहे़ त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे़ तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे गाव म्हणून ताडकळस ओळखले जाते़ या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून, केंद्राची इमारत जुनाट झाली आहे़ गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने रुग्णालय जागोजागी गळू लागले आहे़ त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत आहे़ पावसाळ्यापूर्वीच या रुग्णालयाची डागडुजी संबंधित विभागाने करणे गरजेचे होते़ परंतु, ते न केल्यामुळे हा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे़ परंतु याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़
प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती
By admin | Updated: September 1, 2014 00:27 IST