शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जायकवाडी जलवाहिनीला गळती

By admin | Updated: January 15, 2016 00:21 IST

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह तसेच पाईपच्या जॉइंटमधून गळती होत असल्याचे आढळून आले आहे. शहराची पाणीटंचाई कामयस्वरूपी निकाली निघावी म्हणून दोन वर्षांपूर्वी सुमारे दोनशे कोटी रूपये खर्च करून ८० किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. सुरूवातीला काही महिने पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सद्यस्थितीत असंख्य ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे. यात अंबडपासून पाहिल्यास अंबड येथील जय भवानी मंगल कार्यालयाजवळ, लालवाडी फाटा, पारनेर फाटा, गोलापांगरी जवळ चार ते पाच ठिकाणी तर मठपिंपळगावजवळही मोठी गळती सुरू आहे. काजळा फाट्यावर गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. इंदेवाडी परिसर, जिल्हा कारागृह परिसरातून पाण्याची नासाडी होते आहे. बहुतांश ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरूस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईपच्या जॉइंटमधूनही पाणी गळती होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जलवाहिनी कंत्राटदरामार्फत तयार केली. त्यामुळे ही जवाहिनी दुरूस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉल्व्ह दुरूस्तीमुळे जुना जालना भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. परिणामी या भागातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. ८० किलोमीटरच्या अंतरावर शेकडो ठिकाणी गळतीमुळे शहागड- जालना जलवाहिनीसारखी स्थिती होते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहागड जलवाहिनीचीही देखरेखीअभावी चाळणी झाली होती. काही शेतकऱ्यांनीही ही जलवाहिनी फोडून पाणी वळविले होते. काही ठिकाणी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. वास्तविक पाहता खडक फोडून भूमिगत जलवाहिनी अंथरणे गरजेचे होते. संबंधित कंत्राटदाराने ही जलवाहिनी जमिनीवर ठेवल्याने जॉइंटमधून पाणी वाहून जात आहे. उच्च दाबामुळे या जलवाहिनीतून चोवीस तास पाणी वाहत असते. अनेकदा व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो. आगामी उन्हाळा पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या जलवाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दुरूस्ती केल्यास वाहून जाणारे लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते. (प्रतिनिधी)