पुरुषोत्तम करवा माजलगावतब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माजलगाव धरण प्रथमच शंभर टक्के भरले आहे; परंतु या धरणाच्या ५ नंबर दरवाज्यासह उजव्या कालव्याच्या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरु आहे. याकडे संबंधित अधिका-याचे दुर्लक्ष होत असल्याने शुक्रवारी समोर आले.माजलगांव धरण ६ वर्षांनंतर भरल्यानंतर यावर्षी परतीच्या पावसाने दोनच दिवसात शंभर टक्के भरले. त्यानंतर जवळपास ८-१० दिवस पाणी धरणातून सोडण्यात आले आवक थांबल्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. दरवाजे बंद केल्यानंतरही गेट क्र मांक ५ मधून पाण्याची गळती होऊ लागली तेव्हापासून जवळपास दोन-अडीच महिन्यांपासून या दरवाजातून लाखो लिटर पाणी दररोज गळती होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागाकडून सर्वच दरवाजांची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते; परंतु गुत्तेदाराने या गेटचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हे गेट जाम झाल्याने यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होताना दिसत आहे.मुख्य गेटसह उजव्या कालव्यावरील एका गेटमधून अशाच प्रकारची पाणी गळती मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परिणामी धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.मागील ४ वर्षांत हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली होती. याचा विसर येथील अधिकाऱ्यांना पडला असल्याचे यावरून स्पष्ट होते.
धरणाला गळती
By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST