नांदेड: आघाडी शासनाने राज्यात विकासाची अनेक कामे केली आहेत़ परंतु केलेल्या कामांचे मार्केटींग करण्यात आम्ही कमी पडलो़ आघाडीचा धर्म पाळत गेली पाच वर्ष अन्याय खपवून घेतला़ त्यामुळे आघाडीचा धर्म पाळण्याचे कुणी आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करुन नये असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगाविला़ नांदेडातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते़ तटकरे म्हणाले, आम्हाला जातीयवादी सरकार निवडून आणायचे नाही़ त्यामुळे मित्रपक्षाने आम्हाला कमकुवत, दुबळे समजू नये़ लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होवू नये याचीही कार्यकर्त्यांनी पुरेपूर खबरदारी घेण्याची गरज आहे़ येत्या १५ ते १७ आॅगस्टला निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे़ समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीला अधिक जागा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु़ परंतु कार्यकर्त्यांनीही मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे़ मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे असेही त्यांनी ठासून सांगितले़ मोदी सरकारने जनतेला अच्छे दिन येणार असल्याची स्वप्ने दाखविली़ परंतु पेट्रोल, डिझेल, रेल्वे अशा सर्वच दरांमध्ये वाढ केली़ शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णयही घेण्यात आले नाही असे म्हणत कृषी मंत्र्यांचे नावही अनेकांना माहित नसल्याचे ते म्हणाले़ शरद पवार कृषीमंत्री असताना शेतमालाच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या होत्या़ त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला़ परंतु यंदा केंद्रशासनाने आधाभूत किमतीमध्ये एक टक्काही वाढ केली नाही़ यापूर्वीच्या शासनाने राबविलेल्या योजनांवरच अन्नधान्याबाबत आपण स्वंयपूर्ण झालो असून या शासनाचे कर्तृत्व काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़ यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगांवकर, माजी खाग़ंगाधरराव कुंटूरकर, गणेशराव दुधगांवकर, आ़प्रदीप नाईक, आ़शंकरअण्णा धोंडगे, आ़विक्रम काळे, माजी आ़प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, रामनारायण काबरा, कल्पना डोंगळीकर, निरीक्षक तोताराम कायंदे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)बाभळीसाठी पुन्हा न्यायालयात जाणार-उपमुख्यमंत्रीसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ३० जून रोजी बाभळीचे दरवाजे उघडण्यात आले़ परंतु त्यामुळे आजपर्यंत साठविलेले सर्व पाणी आंध्रात गेले असून परिसरात पिण्यासाठी सुद्धा पाणी राहिले नाही़ पाऊस पडला नाही किंवा इतर परिस्थिती ओढविल्यास दरवाजे खाली ठेवावे की वर? याबाबत कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेवून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठाविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले़ महाराष्ट्र सदनातील प्रकाराबद्दल त्यांनी शिवसेनेच्या खासदारांवर शिस्तीचे संस्कार केले नसून कशाची एवढी मस्ती आली त्यांना असा प्रश्न उपस्थित केला़ सभागृहात शिवसेनेची केवीलवाणी अवस्था असून केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून लोकांच्या भावनांना हात घालून मते मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो़ जैतापूरला विरोध करतात परंतु त्यांच्याच मित्रपक्षाचे पंतप्रधान जैतापूर प्रकल्प झालाच पाहिजे अशी भूमिका घेतात़ जागावाटपाबाबत त्यांनी शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करीत जागा वाढवून मिळण्याबाबत मात्र आग्रही असल्याचे सांगितले़ परंतु कार्यकर्त्यांनीही गाफील राहू नये असा सल्ला त्यांनी दिला़ ओबीसीचे राज्यातील मोठे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कारला नुसता धक्का लागला़ त्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला़ अशा मोठ्या नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो़ परंतु त्यांच्या घटनेनंतर इतकी घाई गडबड का करण्यात आली़ त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे आपले मत असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले़
आघाडीचा धर्म आम्हाला शिकवू नये
By admin | Updated: July 26, 2014 01:08 IST