शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली. मसाप कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे संमेलन डिसेंबर २०१४ मध्ये उदगीर येथे होणार असून, त्याच्या तारखा संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके हे निश्चित करून लवकरच घोषित करतील. यावेळी कुंडलिक अतकरे, देवीदास कुलकर्णी, श्याम देशपांडे, भारत सासणे, प्रा. ललिता गादगे, डॉ. जगदीश कदम, रसिका देशमुख, प्रकाश त्रिभुवन, प्रा. भास्कर बडे, प्रा. विलास वैद्य आदींची उपस्थिती होती. संमेलनाध्यक्षांचा अल्पपरिचय1लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ‘इन्किलाबविरुद्ध जिहाद’, ‘अंधेरनगरी’ आणि ‘आक्टोपस’ या तीन कादंबऱ्या, ‘सलोमी’ व ‘दौलत’ या दोन लघुकादंबऱ्या, ‘पाणी-पाणी’, ‘नंबर वन’, ‘आंतरीच्या गूढगर्भी’, ‘अग्निपथ’, ‘कथांजली’ आणि ‘ सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हे चार कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या कादंबऱ्यातून वेगळे विषय हाताळले असून चटका लावणारे लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासन, मसाप, महाराष्ट्र साहित्य परिषद व इतर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. 2देशमुख यांनी महाराष्ट्र व भारतीय प्रशासन सेवेंतर्गत उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केले असून सध्या ते मुंबईत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. एकमुखी निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही सतत वादाचा विषय ठरत असताना आज मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमुखी व कोणताही वादविवाद न होता करण्यात आली. विशेष म्हणजे ३५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी देशमुख यांचे नाव सुचविले व त्यावरच सर्वांनी शिक्कामोर्तब केले. अन्य कुणाचेही नाव समोर आले नाही. गतवर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष सासणे हे प्रशासकीय अधिकारी होते व नियोजित संमेलनाचे अध्यक्षही योगायोगाने प्रशासकीय अधिकारी आहेत.