शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधि विद्यापीठ जूनपासून नाहीच

By admin | Updated: April 17, 2016 01:36 IST

औरंगाबाद : मागील दहा वर्षांपासून चालू असलेली औरंगाबादेतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाची चर्चा यापुढेही चालूच राहणार असून,

औरंगाबाद : मागील दहा वर्षांपासून चालू असलेली औरंगाबादेतील राष्ट्रीय विधि विद्यापीठाची चर्चा यापुढेही चालूच राहणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून २०१६) ते सुरू होण्याची अपेक्षाही मावळली आहे. एखादी गोष्ट मराठवाड्याला मिळायची असल्यास तिला किती विलंब होतो याचे हे विधि विद्यापीठ उत्तम उदाहरण ठरावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मूळ मराठवाड्याची मागणी असलेले राष्ट्रीय विधि विद्यापीठ औरंगाबादेत सुरू करण्याची घोषणा २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात करण्यात आली. २० आॅगस्ट २००९ रोजी हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायम करण्यात आला. यासाठी औरंगाबादेत करोडी येथे २० हेक्टर जागाही मंजूर करण्यात आली. मात्र, त्यानंतर हा विषय सातत्याने प्रलंबित राहिला. औरंगाबादला राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा विषय बाजूला पडून मुंबई आणि नागपूर येथे विधि विद्यापीठासाठी कुलपतींची नियुक्तीही झाली आहे. मुंबईचे विधि विद्यापीठ सुरू झाले आहे, तर नागपूरचे जून २०१६ पासून सुरू होणार आहे. औरंगाबाद येथे विधि विद्यापीठ सुरू होत नसल्याचे पाहून हा विषय न्यायालयात गेला आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०१२-१३ मध्ये औरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू होईल, (पान १ वरून) असे आश्वासन दिले होते. मात्र, हे विद्यापीठ सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी यासंदर्भात अवमान याचिका दाखल केली आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अवमान याचिका मुंबई येथील मुख्य खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागण्याचीही प्रतीक्षा आहे. औरंगाबादला राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन व्हावे यासंदर्भात पूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी खोडा घातला. आता राज्यात विदर्भाचे राज्यकर्ते प्रबळ ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरला विधि विद्यापीठ स्थापन करून मराठवाड्यावर अन्याय केला जात असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत जूनपासून औरंगाबादला विधि विद्यापीठ सुरू होणार नाही, हे आता स्पष्ट होत आहे. चौकट.. मराठवाड्याची केवळ उपेक्षाचराज्य मंत्रिमंडळाने नागपूर आणि औरंगाबादच्या विधि विद्यापीठाच्या कुलपतींचा प्रस्ताव एकत्र पाठवायला हवा होता. तो एकत्रितपणे पाठविला असेल, तर मग केवळ नागपूर विधि विद्यापीठासाठी कुलपती नियुक्त होतात आणि औरंगाबादसाठी होत नाहीत, याचा अर्थ विदर्भही मराठवाड्यावर अन्याय करीत आहे, असाच होतो, अशी प्रतिक्रिया विधि विद्यापीठासंबंधी पाठपुरावा करणारे अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी दिली. राज्य शासनाकडून मराठवाड्याची प्रत्येक बाबतीत कशी उपेक्षा होते याचे हे उदाहरण नागरिकांसमोर असल्याचेही ते म्हणाले.