औरंगाबाद : मुस्लिम बांधवांना पाच बाबी ‘फर्ज’करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हजचा समावेश होतो. आयुष्यात एकदा तरी हजला जाण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. मराठवाड्यातील सुमारे २४०० यात्रेकरूयंदा हजला जाणार आहेत. मंगळवारपासून यात्रेकरूंच्या रवानगीची प्रक्रिया सुरू झाली. औरंगाबादेतील जामा मशीद येथून ‘लबैक अल्लाहुम्मा लबैक’चा जयघोष करीत २७५ हज यात्रेकरूंचा पहिला जथा चिकलठाणा विमानतळावर दाखल झाला. तेथून विशेष विमानाद्वारे यात्रेकरू जेद्दाहला रवाना झाले. यात्रेकरूंना अलविदा करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांचे डोळे यावेळी पाणावले होते.मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील यात्रेकरू सोमवारीच ऐतिहासिक जामा मशीद येथे दाखल झाले.
‘लबैक अल्लाहुम्मा लबैक’
By admin | Updated: August 31, 2016 00:43 IST