जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली. सीसीआयचे केंद्र प्रभारी एस.सी. वर्मा, देशमुख यांनी बोली लावून कापूस खरेदीस सुरूवात केली. प्रारंभाचा भाव ५१०० रूपये देण्यात आला. यावेळी ५१०० ते ४९०१ रूपयां दरम्यान ३७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यावेळी खाजगी व्यापारी कमल बगडिया, आनंद मंत्री, राधामोहन अग्रवाल, पवन गौड, शरद गुप्ता, बाजार समितीचे संचालक अनिल सोनी, रमेश तोतला, सचिव गणेश चौगुले, मोहन राठोड, अनिल खंडाळे, रामेश्वर चिनके, संजय छबिलवाड,प्रफुल हिवरेकर, संजय जाधव, मुन्ना कुचेरिया, श्रीकांत कचरे, बाबूराव क्षीरसागर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जालना बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ
By admin | Updated: December 27, 2016 00:12 IST