शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
4
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
5
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
6
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
7
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
8
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
9
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
10
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
11
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
12
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
13
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
14
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
15
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
16
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
17
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
18
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
19
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय

धरपकड सुरू; १८ जण ताब्यात

By admin | Updated: May 24, 2017 00:27 IST

बीड : पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटकसत्र राबवून १८ जणांना अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंददरम्यान हुल्लडबाजी व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी तीन ठाण्यांत चार गुन्हे नोंद असून १४७ जणांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटकसत्र राबवून १८ जणांना अटक केली आहे.सोमवारी शहरातून बंदचे आवाहन करणारी रॅली निघाली होती. यावेळी पोलिसांना हुलकावणी देत रॅलीतील काही कार्यकर्ते वेगवेगळ्या दिशेला गेले. त्यानंतर अंधाधूंद दगडफेक व हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. तोडफोड केल्याने लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची पोलिसांत नोंद आहे. आसेफनगरातील दगडफेकप्रकरणी शहर ठाण्यात किराणा व्यापारी अकबर खान पठाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ३५ जणांवर गुन्हा नोंद झाला होता. दुकानाच्या काचा फुटल्याने ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यापैकी श्रीराम मस्के, विजय मोटे, रोहिदास भांबे, दीपक आमटे, विनोद इंगोले, महेश बागलाने, सचिन घोडके, संदीप पारडे, शुभम डाके यांना अटक केली आहे. पेठ बीड ठाण्याच्या हद्दीतील मोंढा भागात दगडफेक केल्याप्रकरणी १० ते १५ जणांवर गुन्हा नोंद असून त्यापैकी पाच जणांना जेरबंद केले आहे. गहिनीनाथ वाणी, रोहित गलधर, शुभम वीर, सिद्धांत वरपे, प्रमोद घोडके यांचा समावेश आहे. शिवाजीनगर ठाणे हद्दीत दगडफेक करुन खासगी मालमत्ता व वैद्यकीय सेवेचे ५५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पोहेकॉ किसन सानप यांच्या फिर्यादीवरुन ७६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे, मनविसे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव, गणेश मोरे, योगेश शेळके, राहुल टेकाळे, दादासाहेब खिंडकर, धनंजय जगताप, महेश धांडे, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, नागेश मिठे, सचिन हावळे, हनुमंत कदम, गणेश जगताप, अमित काकडे, अशोक रोमण, स्वप्निल पिंगळे व इतर साठ जणांना आरोपी केले आहे. यापैकी अमित काकडे, गणेश जगताप, संतोष कदम व अशोक बेद्रे यांना अटक केली आहे. नाहक गोवल्याचा आरोपपोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्यांना नाहक गोवल्याचा आरोप होत आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ या संदर्भात पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे.पत्रकबाज पदाधिकारी चिडीचूपबंदच्या पूर्वतयारीसाठी विविध पक्ष- संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. काहींनी पत्रकांतून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले; परंतु बंददरम्यान झालेल्या दगडफेक व मारहाणीच्या घटनेनंतर काही पदाधिकारी रॅलीतून गायब झाले.