शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हास्याच्या फवा-यांनी रंगला ‘एंटरटेनमेंट जबरदस्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:29 IST

विनोदी धाटणीचे उखाणे, सिनेकलाकारांची मिमिक्री आणि सोबतीला बच्चे कंपनीचा धमाल डान्स शो, अशा रंगीबेरंगी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांनी रविवारी (दि.१९) लोकमत हॉल येथे झालेल्या ‘एंटरटेनमेंट जबरदस्त’ कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. ‘लोकमत’ आणि कलर्स वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विनोदी धाटणीचे उखाणे, सिनेकलाकारांची मिमिक्री आणि सोबतीला बच्चे कंपनीचा धमाल डान्स शो, अशा रंगीबेरंगी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांनी रविवारी (दि.१९) लोकमत हॉल येथे झालेल्या ‘एंटरटेनमेंट जबरदस्त’ कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. ‘लोकमत’ आणि कलर्स वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यादरम्यान ‘लोकमत’च्या सर्व वाचकांसाठी तसेच सखी मंच, प्रिव्हिलेज मंच आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विनोदी उखाणे, विनोदी चुटकुले स्पर्धा घेण्यात आली.उखाणे स्पर्धेदरम्यान महिलांच्या बरोबरीने पुरुष स्पर्धकांनी दाखविलेला उत्साह अपूर्व होता. विनोदी उखाण्यांनी कार्यक्रमात एकच धूम केली.स्पर्धकांनी काही आशयघन तर प्रसंगी मिश्किल विनोद निर्माण करून आपल्या जोडीदाराचे नाव घेऊन उपस्थितांची दाद मिळविली.कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात खास मुंबई येथून आलेले सुप्रसिद्ध मराठी विनोदी कलाकार प्रकाश भागवत यांनी गमतीदार किस्से सांगून सभागृहात हास्यांचे फवारे उडविले. त्यांच्या प्रत्येक विनोदाला पे्रक्षकांनी खळखळून दाद दिली. यामुळे सभागृहात जणू ‘हशा आणि टाळ्या’ असे धमाल वातावरण निर्माण झाले होते.कलीम पटेल यांनी सिनेकलावंतांच्या मिमिक्री सादर करून उपस्थितांना खळखळून हसविले. यानंतर विनोदी चुटकुले स्पर्धेत स्पर्धकांनी सादरीकरण करून कार्यक्रम अधिक रंगतदार केला. नाट्यकर्मी शोभा दांडगे, महेश अचिंतलवार यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली.विनय शर्मा आणि कलीम पटेल यांनी संचालन केले.