शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या जागेसाठी अधिकाऱ्यांची फिल्डींग!

By admin | Updated: September 9, 2015 00:15 IST

महेश पाळणे , लातूर शांतताप्रिय जिल्हा म्हणून लातूरची सर्वत्र ओळख आहे़ अनेक विभागातील अधिकारी लातूरसाठी प्रयत्न करीत असतात़ त्याला क्रीडा क्षेत्र तरी कसे अपवाद ठरावे़ नुकतीच

महेश पाळणे , लातूरशांतताप्रिय जिल्हा म्हणून लातूरची सर्वत्र ओळख आहे़ अनेक विभागातील अधिकारी लातूरसाठी प्रयत्न करीत असतात़ त्याला क्रीडा क्षेत्र तरी कसे अपवाद ठरावे़ नुकतीच लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची पदोन्नती उपसंचालक म्हणून झाली आहे़ त्यामुळे होणाऱ्या या रिक्त जागेवर अनेक क्रीडा अधिकाऱ्यांचे डोळे आहेत़ त्यातच बाहेर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही फिल्डींग लावल्याने या पदाची ‘हंडी’ कोण फोडणार याकडे क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे़ गेल्या दोन अडीच वर्षापासून लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी पदी कार्यरत असलेले आऱडी़ माहादावाड यांची नुकतीच औरंगाबाद येथे क्रीडा उपसंचालक म्हणून पदोन्नती झाली आहे़ यासोबतच वर्धाचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनाही नागपूर येथे विभागीय क्रीडा उपसंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे़ औरंगाबाद येथील क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांचीही दोन दिवसापूर्वीच पुण्याच्या मुख्यालयी बदली झाली आहे़ या बदली, पदोन्नतीने लातूरचे जिल्हा क्रीडाधिकारी हे पद रिक्त होणार असल्याने जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत़ कोणी सत्ताधारी आमदारांच्या शिफारस पत्राने तर कोणी राजकीय पक्षांच्या शिफारशीने तर काहींनी विविध मार्गांनी आपली फिल्डींग लावली आहे़ त्यामुळे ही माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे येत्या काही दिवसांत समजणार असले तरी क्रीडा क्षेत्रात याची चर्चा सुरु आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)रिक्त होणाऱ्या या जागेवर अनेकांचे डोळे आहेत़ त्यातच शेजारी असलेल्या नांदेडच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचाही या जागेवर डोळा असल्याचे समजते़ लातूरच्या जिल्हा क्रीडा कार्यालयातील काही क्रीडा अधिकारीही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत़ पुण्याच्या कार्यालयाकडून या बाबतचा अहवालही मागविण्यात आले असल्याचे समजले आहे़ क्रीडा खाते यासाठी प्रभारी माणूस देणार का, पूर्ण वेळ देणार हा ही विषय चर्चिला जात आहे़ शासनाचे आदेश, आॅर्डर अद्याप नाही़़़४लातूर आणि वर्धा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश अवर सचिवांनी शुक्रवारी काढले आहेत़ मात्र त्यांना अद्यापी आॅर्डर मिळाली नाही़ येत्या दोन दिवसात त्यांना आॅर्डर मिळणार असल्याचे सुत्रांकडून कळते़ त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अधिकाऱ्यांना आणखी दोन दिवसांचा अवधी फिल्डींग लावण्यासाठी मिळणार आहे़ तसे अनेकांचे प्रयत्नही सुरु आहेत़