शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

लातूरची भेंडी जर्मनीच्या बाजारात

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असले तरी आहे त्या पाणी स्त्रोतावर जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीची लागवड करुन

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान होत असले तरी आहे त्या पाणी स्त्रोतावर जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीची लागवड करुन त्याची विक्री सुरु केली आहे़ लातूरच्या बाजारपेठेपेक्षा दुपटीने बाजारभाव देणाऱ्या जर्मनीत लातूरची भेंडी विक्रीसाठी जात असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एकरी निव्वळ खर्च सोडून १ लाख २० हजारांचे उत्पन्न मिळत आहे़ दुष्काळी परिस्थितीतही लातूरच्या शेतकऱ्यांना कमालीचे उत्पन्न मिळत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून समाधानकारक पर्जन्यमान होत नसल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे़ परंतु, लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आहे त्या जलस्त्रोतावर भेंडीची लागवड करुन उत्पन्न घेणे सुरु केले आहे़ यापूर्वी बीड जिल्ह्यातील भावठणा, परळी, नागापूर, पांघरी येथील शेतकऱ्यांनी ३२ टन भेंडी उत्पादन घेऊन जर्मनीला विक्री करुन त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळविले़ त्याच भेंडीच्या लागवडीची पाहणी लातूरच्या २४ शेतकऱ्यांनी केली असून, त्यांनीही त्याच पद्धतीने उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये औसा तालुक्यातील ८, निलंगा तालुक्यातील १५ आणि लातूर तालुक्यातील १ अशा एकूण २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीची लागवड केली़ त्या भेंडीच्या उत्पादनाचे निरीक्षण फायटोसॅनिटरी निरीक्षक ए़ पी़ पाटील यांनी पाहणी करुन एक्सपोर्टर विजय कावंदे यांना सदरील भेंडी पाठविण्यायोग्य असल्याचे सांगितल्यानंतर लातूर जिल्ह्यातील २४ शेतकऱ्यांचे दीडशे ते दोनशे टन भेंडी जर्मनीला नेण्याचा निर्णय घेतला आहे़ यापूर्वी बीड जिल्ह्यातील चार गावातील शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २० हजाराचा खर्च येणार असून, त्यांना एकरी १ लाख २० हजाराचा निव्वळ खर्च जाता नफा मिळाला आहे़ त्या शेतकऱ्यांच्या वाटचालीवर लातूरच्या २४ शेतकऱ्यांनी ४२ एकरवर भेंडीचे उत्पन्न घेतले आहे़ हे उत्पन्न बाराही महिने घेता येत असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतही दिलासा मिळणार असल्याचा विश्वास कृषी विभागाचे फायटोसॅनिटरी निरीक्षक ए़ पी़ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़