शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

लातुरला ‘सभापती’पदाच्या घोषणेचे औचित्य

By admin | Updated: August 27, 2014 00:41 IST

आशपाक पठाण , लातूर पंचायत समिती सभापती पदांचे सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. लातूर पंचायत समितीचे सभापतीपद

आशपाक पठाण , लातूरपंचायत समिती सभापती पदांचे सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांना सभापतीपदाचे वेध लागले आहेत. लातूर पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचीत जातीसाठी राखीव झाले आहे. काँग्रेसचे बहुमत असलेल्या पंचायत समितीत भातांगळी गणातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव हे सध्या तरी एकमेव दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिला असल्याने पुन्हा महिलेला संधी मिळण्याची शक्यता धुसरच आहे. लातूर पंचायत समितीत १८ पैकी १६ सदस्य हे काँग्रेसचे आहेत. तर दोघे जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. अनुसूचीत जातीच्या प्रवर्गातून चार सदस्य निवडून आले आहेत. गाधवड गणातून मनीषा श्रीमंत गायकवाड, कव्हा गणातून दीपमाला नेताजी मस्के, भातांगळी गणातून रावसाहेब सुदाम भालेराव व बोरगाव गणातून राष्ट्रवादीचे अंकुश भानुदास कांबळे हे निवडून आले आहेत. काँग्रेसचे बहुमत असल्याने रावसाहेब भालेराव यांचीच सभापतीपदी वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. शांत, संयमी स्वभाव असलेल्या भालेरावांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महिला सभापती असल्या तरी अनुसूचीत जातीसाठी सभापतीपद राखीव झाल्याने मनीषा गायकवाड व दीपमाला मस्के यांच्यापैकी एकास संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्टेंबर महिन्यात सभापतींचा कार्यकाल संपणार असल्याने सभापती व उपसभापती पदांच्या निवडी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. इच्छुकांनी सभापती व उपसभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या लातूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या नावावर बाभळगावातूनच शिक्कामोर्तब होणार आहे़ उपसभापतीसाठी मात्र इच्छुकांमध्ये रस्सीखेच होईल़लातूर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीत दरवेळी पूर्व-पश्चिम भागाला समान संधी देण्याचा प्रयत्न राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ़ वैजनाथ शिंदे यांनी केला आहे़ पूर्व भागातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव यांची सभापतीपदी वर्णी लागल्यास उपसभापतीपद हे पश्चिम भागाला देण्यात येईल़ पश्चिम भागातून वांजरखेडा गणातून निवडून आलेले अ‍ॅड़ लक्ष्मण पाटील हे उपसभापतीपदासाठी इच्छुक आहेत़ पूर्व-पश्चिम भागाचा विचार झाल्यावर लक्ष्मण पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे़ शहरी व ग्रामीण असा निकष लावल्यावर बाभळगाव गणातील जहांगीर सय्यद यांना उपसभापतीपद दिले जाईल़ अ‍ॅड़ लक्ष्मण पाटील, जहांगीर सय्यद व बाळासाहेब कदम, व्यंकटराव पाटील यांच्यात रस्सीखेच होणार आहे़