शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लातुरकर म्हणतात भाजपचाच अडथळा!

By admin | Updated: November 12, 2014 00:26 IST

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले असून, बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला हे शासन सामोरे जात आहे़

लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले असून, बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला हे शासन सामोरे जात आहे़ दरम्यान, राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा की, शिवसेनेला सहभागी करावे असा पेच निर्माण झाला आहे़ त्या अनुषंगाने सर्व्हेक्षणाद्वारे लातूर शहरातील शंभर नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले असता, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही़ शिवाय हा पाठिंबा अयोग्य असून, भाजप सेनेच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे़ त्यामुळे सेनेला शासनात सहभागी करुन घ्यावे, असे मत नोंदविले आहे़ सध्यातरी या भूमिकेला भाजपकडून अडथळा होत असल्याचे मत नागरिकांनी सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे़ ७१ टक्के लोकांनी भाजपकडून अडथळा होत असल्याचे म्हटले असून, २९ टक्के लोकांनी सेना जबाबदार असल्याचे म्हटले आहे़ तर ७७ टक्के लोकांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याला विरोध दर्शविला आहे़ केवळ २३ टक्के लोकांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास समर्थन दिले आहे़भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची गेल्या २५ वर्षांपासूनची युती होती़ ही युती नैसर्गिक आहे़ शिवाय विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने या दोन्ही पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे़ पहिल्या दोन सर्वाधिक संख्याबळ असलेल्या या दोनच पार्ट्या आहेत़ त्यामुळे या दोन्ही पक्षाचे मिळून सरकार स्थापन व्हावे, असे मत ७६ टक्के लोकांचे आहे़ केवळ २४ टक्के लोकांनी भाजप सेनेचे सरकार होऊ नये असे मत नोंदविले आहे़ सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने दोन्हीही पक्षाकडून बोलणी सुरु आहे़ परंतु त्यात सर्वाधिक अडथळा भाजपकडून होत असल्याचे सर्व्हेक्षणात व्यक्त झालेले मत आहे़ ७१ टक्के लोक भाजपाची भूमिका युती होण्यास अडथळ्याची ठरत असल्याचे म्हटले आहे़ तर २९ टक्के लोकांनी नैसर्गिक युतीला सेनेकडून अडथळा येत असल्याचे म्हटले आहे़अल्प मतातील सरकार बहुमतात येण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेणे योग्य नसल्याचे मत ७७ टक्के लोकांनी नोंदविले आहे़ केवळ २३ टक्के लोकांनी पाठिंबा घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे़ तरीही भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यास सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही़ मध्यंतरीच हे सरकार कोसळेल, असे लातुरकरांना वाटते़ १०० पैकी ७३ टक्के लोकांना सरकार टिकणार नाही असे वाटत आहे़ केवळ ८ टक्के लोकांनी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे़ तर १९ टक्के लोकांनी या बाबत काही सांगता येत नाही असे म्हटले आहे़ लातुरकरांना सेनेने शासनामध्ये सहभागी व्हावे, असे वाटते़ ६९ टक्के लोकांनी शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्यापेक्षा सत्ताधारी बाकावर बसावे असे म्हटले आहे़ केवळ ३१ टक्के लोकांनी आता नाही, सेनेने विरोधी बाकावरच बसून विरोधकाची भूमिका वटवावी, असे मत नोंदविले आहे़ ३१ टक्के लोकांनी भाजपा सोबत राहू नये असे मत नोंदविले आहे़निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका युती करण्याबाबत सकारात्मक राहिली आहे़ परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वतंत्र लढण्याचीच होती़ त्यामुळे नैसर्गिक युतीला अडथळा आला़ सरकार बनवितानाही शिवसेनेने दोन पाऊले मागे टाकले आहेत, परंतु भाजपाची भूमिका सकारात्मक नाही़ त्यामुळे युतीचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे मत सर्व्हेक्षणात लोकांनी व्यक्त केले आहे़ एकंदर शिवसेनेच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये सहानुभूती असल्याचे या सर्व्हेक्षणातून निदर्शनास आले आहे़भाजपाचे सरकार आरुढ झाले आहे़ शिवसेना सत्तेत जाणार की विरोधात बसणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही़ रोखठोक भूमिका घेऊन सेनेने आता स्पष्ट भूमिका घ्यायला हवी, अशी मतेही सर्व्हेक्षणातून पुढे आली आहेत़