शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’ वितरणात लातूर तालुका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:38 IST

लातूर : आॅनलाईन प्रमाणपत्र वितरणात लातूर तहसील मराठवाड्यात प्रथम तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आली आहे. वर्षभरात महा-ई सेवा केंद्राच्या माध्यमातून ७५ हजार ५०६ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

लातूर शहरासह तालुक्यात ४२ महा-ई सेवा केंद्र आहेत. या केंद्रांमार्फत वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, रहिवासी, मिळकत आदी प्रमाणपत्रे दिली जातात. गावस्तरावर महा-ई सेवा केंद्राच्या माध्यमातून आॅनलाईन पाठविण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी प्रमाणपत्रांचे वितरण करतात. तहसीलदार संजय वारकड यांच्या नियोजनामुळे वेळेत प्रमाणपत्रे दिली जात आहेत. वर्षभरात ७५ हजार ५०६ प्रमाणपत्रे वाटप झाल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. मराठवाड्यात लातूर तहसील आॅनलाईन प्रमाणपत्र वितरणात अव्वल आली असून, राज्यात चौथ्या क्रमांकावर असल्याचे तहसीलदार वारकड यांनी सांगितले. महा-आॅनलाईन पोर्टलवरून प्रमाणपत्र वितरणाच्या सुविधा आहेत.(प्रतिनिधी)नागरिकांची सोय व्हावी म्हणून शासनाने आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची योजना सुरू केलेली आहे. वर्षभरात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार लातूर तहसीलचे तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार एस.एम. पालेवाड, नायब तहसीलदार सुरेश पाटील, आम्रे-पाटील, स्वाती गणगे, एस.टी. पेठकर, स्वाती गवळी यांनी सामुहिक प्रयत्न केल्यामुळे नागरिकांना वेळेत प्रमाणपत्रे मिळाली, हे कर्मचाऱ्यांचे सामुहिक यश असल्याचे तहसीलदार वारकड म्हणाले.