शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

राज्य मंडळ पथकांकडून लातूर विभागीय मंडळाची झाडाझडती

By admin | Updated: May 22, 2015 00:32 IST

भालचंद्र येडवे , लातूर मंडळ कामकाजात एकसुत्रीपणा यावा, कार्यप्रणाली सोपी व्हावी व अनावश्यक खर्च टाळता यावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यमंडळ पथकाने तब्बल

भालचंद्र येडवे , लातूरमंडळ कामकाजात एकसुत्रीपणा यावा, कार्यप्रणाली सोपी व्हावी व अनावश्यक खर्च टाळता यावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यमंडळ पथकाने तब्बल तीन दिवस लातूर विभागीय मंडळाची झाडाझडती केली़ लातूरचा बोर्ड कामकाजाचा श्रीगणेशा करुन आता हे पथक राज्यभर फिरणार आहे़ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या कार्यप्रणालीवर उलटसुलट चर्चा सुरु होती़ शिवाय मंडळाच्या खर्चावर नियंत्रण ठेवून कामकाजात एकसुत्रीपणा आणण्यासाठी ओरड सुरु होती़ राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधरराव ममाने यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेत, त्यांच्यासह राज्य मंडळाच्या सात कर्मचाऱ्यांचे पथक मुक्रर केले़ राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कामकाजात सुधारणा, खर्चावर नियंत्रण, मंडळाचा फायदा व कार्यप्रणाली सोपी करण्यासाठी हे पथक राज्यातील नऊ विभागीय मंडळ कार्यालयात प्रत्यक्ष जावून तपासणी करणार आहे़ राज्य मंडळाच्या पथकाने गेल्या तीन दिवसांपासून लातूर विभागीय मंडळाच्या कामकाजाची तपासणी केली़ बुधवारी दस्तुरखुद्द राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधरराव ममाणे हे लातुरात येऊन येथील मंडळ कामकाजाचा आढावा घेतला़ लातूर विभागीय मंडळात जरी मोठ्या प्रमाणात त्रुट्या नसल्या तरी पुढच्या दौऱ्यापर्यंत या ठिकाणी झालेल्या चुका व कामकाजात एकसुत्रीपणा यावा, यासाठी सर्व विभागप्रमुखांना सूचना केल्या़ विशेष करुन अस्थापना, लेखा व भांडार या तीन विभागावर मंडळ अध्यक्षांनी करडी नजर ठेवत संबंधीतांना योग्य त्या सूचना दिल्या़ आता हे पथक संपूर्ण राज्यभरातील विभागीय मंडळांना भेटी देवून तेथील कामकाजाची तपासणी करणार आहे़ शेवटी सर्व विभागीय मंडळांकडून प्राप्त झालेल्या सुचनांचा गोषवारा तयार करुन राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कामकाजात एकसुत्रीपणा आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़ राज्यमंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे एकीकडे कौतुक होत असताना, दुसरीकडे अनेकांच्या छातीत धडधडी भरली आहे़