लातूर : लातूर शहारात अनेक ठिकाणी गढूळ व अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्रिमूर्ती नगर भागातील नागरिकांनी अशुद्ध व गढूळ पाणी बकेटमध्ये जमा करून सोशल मीडियावर त्याचे चित्र टाकून प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही वर्तविली आहे. लातूर शहरातील नागरिकांना नळा व्दारे येणाऱ्या पिण्याचे पाणी घाण व दुर्गंधीयुक्त येत येत आहे़ नागरिकांना नळाचे पाणी पंधरा दिवसांआड एकदा मिळत आहे़ हे मिळणारे पाणी पण घाण व दुर्गंधीयुक्त असल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. पंधरा दिवसांआड पाणी सोडण्यात येते. तसेच शहरात अनेक भागात पाईप लाईन लिकेज मोठ्या प्रमाणात असल्याने गढूळ पाणी येते, असा नागरिकांचा अंदाज आहे. पंधरा दिवसांआड एकदाच मिळणारे पाणी शुध्द व चांगले मिळावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
गढूळ व अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे लातूर शहरातील नागरिक त्रस्त
By admin | Updated: May 12, 2015 00:51 IST