हरी मोकाशे ,लातूरजिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात १७८ उमेदवार रिंगणात आहेत़ लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची संपत्ती ही कोटीच्या घरात आहे़ त्यामुळे सर्वात श्रीमंत उमेदवारांचा मतदारसंघ लातूर शहर ठरत आहे़ जिल्ह्यात सर्वात कमी संपत्ती असलेले लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे हरिश्चंद्र साबदे असून त्यांच्याकडे केवळ ५५ हजार रुपयांची संपत्ती आहे़विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी आपल्या संपत्तीचे विवरणपत्र सादर केले आहे़ त्यातून ही माहिती पुढे आली असून संपत्तीच्या आढाव्यात पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेशअप्पा कराड यांच्याकडे रोख ४ लाख रुपये असून जंगम मालमत्ता ७५ लाख ३२ हजार ३६२ रुपये आहे़ त्यांच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही़ मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्याकडे रोख ८ लाख रुपये असून जंगम मालमत्ता १४ लाख ७१ हजार ८९९ रुपयांची आहे़ स्थावर मालमत्ता ४० लाख रुपयांची आहे़ राष्ट्रवादीच्या उमेदवार आशाताई भिसे यांची जंगम मालमत्ता ६४ लाख रुपयांची असून स्थावर मालमत्ता २ कोटी १७ लाख रुपयांची आहे़ काँग्रेसचे उमेदवार त्र्यंबक भिसे यांची जंगम मालमत्ता ७ लाख १८ हजार ४१९ रुपये ३९ पैसे आहे़ वारसा दायित्वे त्यांच्याकडे ५३ लाख ५० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे़ शिवसेनेचे उमेदवार हरिश्चंद्र साबदे यांच्याकडे जंगम मालमत्ता ५० हजार रुपये असून वारसा दायित्वे स्थावर मालमत्ता ही ५ हजार रुपये आहे़निलंगा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर यांची जंगम मालमत्ता ६३ लाख ७२ हजार ६७२ रुपये असून स्थावर मालमत्ता ३० लाख १५ हजार रुपये आहे़ भाजपाचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जंगम मालमत्ता ३२ लाख ५२ हजार १८३ रुपये असून स्थावर मालमत्ता १ कोटी ७२ लाख रुपये आहे़ राष्ट्रवादीचे उमेदवार बस्वराज पाटील नागराळकर यांची जंगम मालमत्ता १८ लाख ४९ हजार ७३३ रुपये असून स्थावर मालमत्ता ५६ लाख ७८ हजार रुपये आहे़औसा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पाशा पटेल यांची जंगम मालमत्ता ४७ लाख ५६ हजार ६९५ रुपये असून स्थावर मालमत्ता २३ लाख ५० हजार रुपये आहे़ राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश्वर बुके यांची जंगम मालमत्ता २७ लाख २० हजार १० रुपये तर स्थावर मालमत्ता १२ लाख २८ हजार ८०० रुपये आहे़ शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने यांची जंगम मालमत्ता ९२ लाख ९४ हजार ५९३ रुपये तर स्थावर मालमत्ता ८० लाख ३७ हजार २०६ रुपये आहे़ मनसेचे उमेदवार बालाजी गिरे यांची जंगम मालमत्ता ४० लाख रुपये असून स्थावर मालमत्ता ९८ लाख रुपये आहे़उदगीर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रामकिशन सोनकांबळे यांची जंगम व स्थावर मालमत्ता २१ लाख ९५ हजार रुपयांची आहे़ मनसेचे उमेदवार शिवाजी कोकणे यांच्याकडे २ लाख ७१ हजार १२५ रुपयांचे सोने असून स्थावर मालमत्ता २० लाख रुपयांची आहे़ शिवसेनेचे उमेदवार रामचंद्र अदावळे यांची जंगम मालमत्ता १० लाख २१ हजार ७८६ रुपये असून स्थावर मालमत्ता ९० लाख रुपयांची आहे़ राष्ट्रवादीचे उमेदवार संजय बनसोडे यांच्याकडे १ लाखाची रोकड असून ४२ लाख ६५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे़ जिल्ह्यात सर्वात कमी संपत्ती शिवसेनेच्या उमेदवारांकडे आहे़ यात लातूर ग्रामीण, अहमदपूर, निलंगा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आहेत़ उदगीरमधील काँग्रेसचे, औशातील राष्ट्रवादीचे आणि अहमदपुरातील भाजपाच्या उमेदवारांच संपत्ती ही ५० लाखांपेक्षा कमी आहे़आशाताई भिसे (राष्ट्रवादी), शैलेश लाहोटी (भाजपा), संभाजीराव पाटील निलंगेकर (भाजपा), दिनकर माने (शिवसेना), मुर्तूजा खान (राष्ट्रवादी), श्रीपाद कुलकर्णी (शिवसेना), बालाजी गिरे (मनसे), रामचंद्र अदावळे (शिवसेना) हे उमेदवार एक कोटीपेक्षा जास्त संपत्तीचे धनी आहेत़ ५० लाखांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक...४अशोकराव पाटील निलंगेकर (काँग्रेस), बसवराज पाटील नागराळकर (राष्ट्रवादी), पाशा पटेल (भाजपा), ओम पुणे (मनसे), शिवप्रसाद मालू (मनसे), रमेशअप्पा कराड (भाजपा), त्र्यंबक भिसे (काँग्रेस), संजय बनसोडे (राष्ट्रवादी) हे उमेदवार ५० लाखांपेक्षा जास्त संपत्ती असलेले आहेत़लातूर शहर मतदारसंघातील भाजपाचे शैलेश लाहोटी यांच्याकडे २ लाख ५ हजार रुपयांची रोकड असून जंगम मालमत्ता ४४ लाख १३ हजार ९०४ रुपये आहे़ स्थावर मालमत्ता २ कोटी ३५ लाख रुपये आहे़ शिवसेनेचे उमेदवार श्रीपाद कुलकर्णी यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोकड असून जंगम मालमत्ता ४० लाख ९० हजार ७६१ रुपये तर स्थावर मालमत्ता ९५ लाख रुपयांची आहे़ ४राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मुर्तूजा खान यांच्याकडे रोख १ लाख रुपये असून जंगम मालमत्ता ७ लाख २० हजार रुपये आहे़ स्थावर मालमत्ता १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपये आहे़ मनसेचे उमेदवार शिवप्रसाद मालू यांच्याकडे रोख ५१ हजार रुपये असून जंगम मालमत्ता १६ लाख २६ हजार ५९५ रुपये आहे़ स्थावर मालमत्ता ६४ लाख रुपयांची आहे़ तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ जनार्दन वाघमारे यांच्याकडे रोख २० हजार रुपये असून जंगम मालमत्ता १ कोटी ५ लाख ७८ हजार १४ रुपये आहे़ स्थावर मालमत्ता १ कोटी ५० लाख ३ हजार ४०० रुपये आहे़ लातूर शहर मतदारसंघातील राजकीय पक्षाचे बहुतांश उमेदवार हे श्रीमंत आहेत.
लातूर शहर मतदारसंघ श्रीमंतांचा !
By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST