शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथे प्रशासकीय संकुल निर्मितीची दोन वर्षांपासून फक्त चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:25 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी दोन वर्षांपासून फक्त चर्चा सुरू आहे. २०१६ मध्ये इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले नाही. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत ते प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमराठवाडा : मंत्रालयाच्या धर्तीवर सर्व शासकीय कार्यालयांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न; प्रकरण पुढे सरकेना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी दोन वर्षांपासून फक्त चर्चा सुरू आहे. २०१६ मध्ये इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले नाही. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत ते प्रशासकीय संकुल बांधण्यात येणार आहे.भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालय वगळता उर्वरित ४५ प्रशासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. त्या इमारती कार्यालयासाठी पोषक नाहीत; परंतु एकत्रित इमारत नसल्यामुळे पर्याय म्हणून ती कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठकीनिमित्त व इतर कार्यक्रमांमुळे कॅबिनेट मंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, आयुक्त, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुलात मंत्रालयीन दर्जाचे बैठक सभागृह, विश्रामगृह, सुसज्ज प्रशासकीय दालने, सर्व कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यासाठी संकुल उभारण्याचा विचार पुढे आला.१२ एकर जागा; ५० कोटींचा खर्चत्या प्रशासकीय संकुलासाठी १२ एकर जागा लागणार आहे. ५० कोटींच्या आसपासचा खर्च या संकुलावर होण्याची शक्यता आहे, त्या खर्चातही आता वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यायी जागा म्हणून लेबर कॉलनीतील जागेचा विचार सुरू झाला; परंतु त्या जागेच्या मालकीवरून वाद सुरू झाल्यानंतर ते प्रकरण थांबले. ३ वर्षांपर्यंतचा कालावधी ते संकुल बांधण्यासाठी लागणार आहेत, दोन वर्षे जागेसाठी वाट पाहण्यात गेले आहेत. महत्त्वाकांक्षी आणि औरंगाबाद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे ते भव्य संकुल असावे. यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्याचे कामही कासवगतीने सुरू आहे. या संकुलासाठी शासनाच्या मालकीच्या मिटमिटा, सातारा, लेबर कॉलनी परिसरातील काही जागा पर्याय म्हणून पुढे आल्या. लेबर कॉलनीतील जागा अंतिम झाली मात्र, तेथील भाडेकरु आणि शासन यांच्यात मालकीवरून वाद आहे.संकुलाची गरज कशासाठीप्रशासकीय कार्यालये सध्या शहरातील वेगवेगळ्या भागात विखुरलेली आहेत. बोटावर मोजण्याइतक्या कार्यालयांना स्वत:ची इमारत आहे.भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या शासकीय कार्यालयांना विद्यमान जागा पोषक नाही. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुल होणे महत्त्वाचे आहे. ४५ हून अधिक वेगवेगळी सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे त्यांचे एकत्रित संकुल असावे, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.विभागीय आयुक्त म्हणालेविभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर म्हणाले, लेबर कॉलनीच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत बांधकाम विभाग माहिती देऊ शकेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने माझ्याकडे अद्याप प्रशासकीय संकुल प्रकरणात काहीही माहिती दिलेली नाही.