शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीस शेवटचे तीन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:42 IST

जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर्वरितांची तूर खरेदी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. मात्र यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकºयांचीही तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रशासनाने मागील काही दिवसांपासून खरोखरच किती शेतकºयांची तूर शिल्लक आहे याची चाचपणी केली. अनेकांची नोंदणीच बोगस तर काहींनी तूर विकल्याचे समोर आले आहे. उर्वरितांची तूर खरेदी करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला. मात्र यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत.हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदीचा प्रश्न सुरुवातीपासूनच चिघळलेला होता. त्यातही हिंगोली जिल्ह्यात तर शेतकºयांनी मोंढ्यात मोठी गर्दी केल्याने टोकन पद्धत करून टप्प्या-टप्प्याने तूर मागवावी लागली. अनेकदा केंद्रही बंद पडले. काँग्रेसचे खा.राजीव सातव यांनी आंदोलनही केले. शिवसेनेनेही आंदोलनाचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनीही मोंढा बंद असल्याने तेथे भेट दिली होती. तर भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी प्रयत्न केले. ही मुदत येत्या ३0 आॅगस्टला संपणार आहे. तोपर्यंत तरी तूर खरेदी होते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे.प्रशासनाने नोंदणीकृत शेतकºयांची माहिती घेतली तेव्हा जिल्ह्यात ५४ हजार क्ंिवटल तूर शिल्लक असल्याची माहिती मिळाली होती. यात सर्वाधिक ४२४६ शेतकºयांची ४६ हजार ५४८ क्विंटल तूर होती. त्यानंतर वसमतच्या १४२ जणांची १९७१, जवळा बाजारच्या ४१६ जणांची ६ हजार क्ंिवटल तूर होती. केवळ टोकन दिलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केल्याने या शेतकºयांची तूर तशीच शिल्लक राहिली होती. ती खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यावर मंजुरीही मिळाली. मध्यंतरी खाजगी बाजारातही पाच हजारांपर्यंत भाव मिळू लागल्याने अनेकांनी तूर विकली. त्यानंतर प्रशासनाने तलाठ्यांमार्फत तपासणी केली तर ३0 टक्के शेतकºयांची नोंदच बोगस आढळली. तर अनेकांनी तूर विकून टाकली. केवळ ५00 जणांनी घोषणापत्र दिले होते.त्यातील काहींचेही आकडे अवास्तव वाटत असल्याने प्रशासन पहिल्या टप्प्यात कोणताही संशय न उरणाºया शेतकºयांची तूर खरेदी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तीनच दिवस शिल्लक आहेत.