शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साडेबारा कोटी पाच वर्षांपासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:31 IST

परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यासाठी पाच वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीने दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी अजूनही पडून आहे. वळण रस्ता रद्द झाल्यानंतर हा निधी इतर कामांसाठी देणे अपेक्षित असताना तो अद्यापपर्यंत तसाच पडून ठेवल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यासाठी पाच वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीने दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी अजूनही पडून आहे. वळण रस्ता रद्द झाल्यानंतर हा निधी इतर कामांसाठी देणे अपेक्षित असताना तो अद्यापपर्यंत तसाच पडून ठेवल्याची बाब स्पष्ट झाली आहे.परभणी शहरातून जाणाºया राज्य मार्गाला शहराबाहेरुन साडे नऊ कि.मी.अंतराचा वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. हा वळण रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक होते. या भूसंपादनाला सुमारे ७० कोटी रुपयांची आवश्यकता होती. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हा रस्ता तयार केला जाणार होता. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २०११-१२ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला होता. बांधकाम विभागाने कारेगाव, वांगी शिवार या भागात भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती. भूसंपादनासाठी जसाजसा निधी येईल, त्यानुसार भूसंपादन करण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीतून साडे बारा कोटी रुपये उपलब्ध झाले असले तरी उर्वरित सुमारे ५० कोटी रुपयांचा प्रश्न निर्माण झाला होता. या निधीसाठी जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी निधी द्यावा, अशी मागणी केली. परंतु, हा वळण रस्त्याला शासन निधी देऊ शकत नाही, स्थानिक स्तरावरुन त्यासाठी प्रयत्न करावेत, असे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केला. त्यामुळे हा प्रश्न निधीअभावी रखडला होता.दरम्यानच्या काळात परभणी शहरातून जाणाºया राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यामुळे आता बाह्य वळण रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्वीचा साडे नऊ कि.मी.अंतराचा बाह्य वळण रस्ता रद्द करुन त्याही पुढे जावून साडे चौदा कि.मी.अंतराच्या वळण रस्त्याचा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे जुन्या वळण रस्त्याचे काम बंद पडले. या रस्त्यासाठी दिलेला साडे बारा कोटी रुपयांचा निधी वापरात आला नाही. तेव्हापासून हा निधी पडून आहे. दरम्यान, जिल्ह्यात निधी अभावी अनेक कामे रखडलेली असताना जिल्हा नियोजन समितीचा निधी पाच वर्षांपासून पडून असल्याने विकासकामांनाही ब्रेक लागला आहे. परभणी जिल्ह्यासाठी दिलेल्या या निधीचा योग्य वापर व्हावा, यासाठी शासनाने तो इतर विकासकामांकरीता वळता करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.