पूर्णा: येथील पशूवैद्यकीय इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून केव्हाही ही इमरात पडू शकते. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जनावरांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन इमारतीची मागणी पशूपालकांतून होत आहे.पूर्णा तालुक्याच्या निर्मितीपासून परिसरातील शेतकर्यांच्या सुविधेसाठी पशूवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे. सध्या या दवाखान्याच्या इमारतीस जागोजागी तडे गेले असून ती पूर्णत: जीर्ण झाली आहे. त्यामुळे या इमारतीत पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात गळती होते. त्यामुळे महत्त्वाचे कागदपत्रे जपून ठेवण्यासाठी अधिकार्यांची दमछाक होते. तसेच परिसरातील पशूपालक मोठय़ा प्रमाणात येथे उपचारासाठी जनावरे आणतात. या दवाखान्यासाठी जागा कमी असल्याने येथे उपचारासाठी आलेल्या जनावारांना या इमारतीचा धोका निर्माण झाला आहे. (/प्रतिनिधी)
पशूवैद्यकीय इमारत मोजतेय शेवटची घटका
By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST