शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन नोंदणीचा आज अखेरचा दिवस

By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST

औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, उद्याचा २७ जून हा आॅनलाइन नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. जे विद्यार्थी भाग एक आणि भाग दोननुसार आॅनलाइन नोंदणी करणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गेल्या दहा दिवसांपासून आॅनलाइन प्रवेशासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू केलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून किंवा झोन केंद्रातून या वेबसाइटवर इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन नोंदणी करायची आहे. ज्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे; पण नोंदणी करताना भाग एक आणि भाग दोन अपूर्ण राहिलेली असतील, हे दोन्ही भाग पूर्ण व अचूक भरणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ शाळेतून, तर मनपा क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही झोन केंद्रामध्ये आवश्यक कागदपत्रे दाखवून उद्या दुपारी चार वाजेपर्यंत दोन्ही भागांत आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरताना काही चूक झाली असल्यास तीदेखील मूळ शाळेत किंवा झोन केंद्रावर जाऊन दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. यंदा अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात एकूण १०४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या महाविद्यालयांमध्ये कला शाखेला ७ हजार ४४० विद्यार्थी, विज्ञान शाखेला १० हजार १२० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ हजार ४८० आणि एमसीव्हीसी शाखेला १ हजार ९२० विद्यार्थी, अशी एकूण २२ हजार ९४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. यापैकी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १३ हजार ३०, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ८ हजार ५७० आणि स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १४०० एवढी प्रवेश क्षमता आहे.