औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मध्यंतरात देण्यात येणाऱ्या मेजवानीतील जिरा राईस (भात) मध्ये सोमवारी अळ्या निघाल्या. नगरसेवकांच्या भोजनातच असा प्रकार झाल्यामुळे सदस्य प्रमोद राठोड यांनी महापौर कला ओझा यांच्यासह सर्व सभागृहाचे लक्ष वेधले. योगराज केटरर्सकडे २०० थाळी भोजन दर सभेला पुरविण्याचे कं त्राट देण्यात आले आहे. १५० रुपयांना एक थाळी जेवण दिले जाते. नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांसाठी ते जेवण असते. त्या जेवणाची कोणतीही गुणवत्ता न तपासता चिकलठाण्यातून ते जेवण तयार करून पालिकेत आणले जाते. केटरर्सच्या आवारात ते जेवण गरम केले जाते. त्यानंतर ते मनपातील सभागृहाशेजारी कॅन्टीनमध्ये आणल्यावर पुन्हा गरम केले जाते. त्या जेवणाची गुणवत्ता पालिकेत कुणीही पाहत नाही. नगरसचिव विभागामार्फत ते कंत्राट दिले जाते.यावर्षी १ वर्षाचे कं त्राट देण्यात आले आहे. १२ सभांसाठी ते कंत्राट असून, ४ लाख रुपयांचा खर्च त्यावर पालिका करते. असे असताना निकृष्ट दर्जाचे जेवण नगरसेवक व अधिकाऱ्यांना केटरर्सने पुरविल्याचे स्पष्ट होत आहे.
नगरसेवकांच्या मेजवानीत निघाल्या चक्क अळ्या!
By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST