शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैठण येथे मुलांच्या वसतिगृहातील जेवणात आढळल्या चक्क अळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:08 IST

पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण येथील उद्यान रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.आम्हाला दररोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केली होती. या आधारे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सदर वसतिगृहात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता जेवणात अळ्या आढळून आल्या. यावरुन विद्यार्थ्यांसमवेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.निवासाची सुविधा, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही आढळून आले. रोज सकाळी नाश्त्यासाठी नासाडीयुक्त फळे, भाज्या देण्यात येतात. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून या अगोदरही वसतिगृहातील असुविधा व निकृष्ट जेवणामुळे होत असलेल्या त्रासाची विद्यार्थ्यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्यासमोर रडत रडत आपली कैफियत मांडली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या तहसीलदारांनी विद्यार्थ्यांसमोरच वसतिगृहातील उपस्थित कर्मचाºयांची चांगलीच कानउघाडणी केली होती. परंतु यानंतर पुढे कोणतीही कारवाई झाली नसल्याने हा प्रकार मागील बºयाच दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे.याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन बेजबाबदार कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, नसता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल राऊत यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागEducation Sectorशिक्षण क्षेत्र