एकीकडे नवीन सदनिकांना जास्त दाबाने मुबलक पाणी तर दुसरीकडे जुन्या वसाहतींना पाण्याचा थेंबही नाही, असे विसंगत चित्र या भागात बघायला मिळते. जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन दिले होते. बकोरिया यांची बदली होताच या गोष्टीचा महापालिकेला विसर पडला. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार २०१२ ते २०१८ पर्यंत नळाला बऱ्यापैकी पाणी येत होते. मात्र, २०१८ पासून अचानक पाणी येणे बंद झाले. तरीही पाणीपट्टी वसुली मात्र चालूच आहे. कूपनलिकेच्या पाण्याची पातळीही खालावलेली आहे. या भागातील नागरिकांनी महापालिकेला अनेक अर्ज, निवेदने दिलेली आहेत. या भागात जोपर्यंत मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार नाही, तोपर्यंत या भागातील पाणी प्रश्न सुटणार नाही. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
हर्सूल टी पॉइंट परिसराला मोठ्या जलवाहिनीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST