शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भाषा आणि शिक्षणाचा व्यवसायात अडसर नाही -धनंजय दातार

By admin | Updated: September 19, 2016 00:12 IST

औरंगाबाद : नोटा मोजता येण्याएवढे शिक्षण व्यवसायासाठी पुरेसे असून, आपणास मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मात्र मनात असायला हवी.

औरंगाबाद : तुम्ही कोणती भाषा बोलता, शिक्षण किती झाले, याचा व्यवसायात कधीच अडसर येत नाही. नोटा मोजता येण्याएवढे शिक्षण व्यवसायासाठी पुरेसे असून, आपणास मोठे व्हायचे आहे, अशी जिद्द मात्र मनात असायला हवी. ग्राहक हा देव असून, तो कोणत्याही धर्माचा असू शकतो, त्यामुळे सर्व धर्मांचा आदर करा, असा सल्ला प्रख्यात उद्योजक, मसालाकिंग धनंजय दातार यांनी रविवारी येथे दिला.अ. भा. ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने बीड बायपासवरील गुरूलॉन्स येथे आयोजित ब्रह्मोद्योग प्रदर्शन आणि ब्राह्मण उद्योजक संमेलनातील परिसंवादात दातार यांनी अतिशय परखड आणि नेमकेपणाने आपला जीवनप्रवास उलगडत यशाची गुपितेही सांगितली. डॉ. नचिकेत वाचासुंदर यांनी दातार यांची मुलाखत घेतली. अकोला येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि लहानपण अतिशय गरिबीत काढलेल्या दातार यांनी वयाच्या केवळ विसाव्या वर्षी दुबई गाठली. वडिलांबरोबर दुकानामध्ये अहोरात्र काम करीत यशाची एकेक पायरी सर केली. हे सारे करताना आपल्याला खूप मोठे व्हायचे आहे, हे मी कधीही विसरलो नाही आणि आजही तेच उद्दिष्ट माझ्यासमोर सतत असते, असे त्यांनी सांगितले.इंग्रजीचा बाऊ करूनकाव्यवसायाकरिता विशिष्ट प्रकारचेच शिक्षण हवे असे म्हणणे साफ चुकीचे असल्याचे सांगत नोटा मोजण्यापुरते शिक्षणही पुरेसे आहे. व्यवहारज्ञान, धाडस, सारासार विवेकबुद्धी आणि ‘मौका देखकर चौका मारना’ जमायला हवे. इंग्रजी भाषेचे अकारण स्तोम माजवू नका, ती येत नसेल तरी काही बिघडत नाही, असे त्यांनी आपल्या अनुभव कथनातून सांगितले.स्वत:च्या पैशाने व्यवसाय न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. बँकांकडून कर्ज काढा, त्यांचे हप्ते व्यवस्थित फेडा, स्वत:ची पत निर्माण करा. धंद्यातून पैसा, नफा मिळविणे हे जरी ध्येय असले तरी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, मिळविलेल्या पैशाचा उपभोगही घ्या, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजीब्राह्मणांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, पौरोहित्य करणाऱ्यांना दरमहा पाच हजार मानधन द्यावे, ब्राह्मणविरोधी लिखाण करणाऱ्या पुस्तकांवर बंदी घालावी, या आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु राज्यात सत्ताबदल झाला. युती सरकार आल्यानंतर ब्राह्मण समाजाने आनंद व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने ब्राह्मण मुख्यमंत्री राज्याला मिळाला; परंतु त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणे टाळले, अशा शद्बात अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ————गुणवत्तेचा वापर करागुणवत्ता ही ब्राह्मण समाजाला जन्मजात मिळालेली देण आहे. या गुणवत्तेचा तरुणांनी प्रत्यक्ष कृतीत वापर करावा, असे आवाहन बडवे इंजिनिअरिंगचे श्रीकांत बडवे यांनी केले. यश कधी एकट्याने मिळत नसते तर त्यासाठी चांगल्या लोकांची टीम तुमच्याबरोबर हवी. आपण काहीतरी वेगळे, दर्जेदार काम करायला लागलो तर यश फार दूर नसते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक मिलिंद कंक, सीए उमेश शर्मा यांचेही भाषण झाले.