शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कामाला महिनाभरात सुरुवात

By admin | Updated: July 17, 2014 00:58 IST

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.

परळी: परळी शहरात नियोजित बायपाससाठी जमीन संपादनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून हे काम जलदगतीने करण्यात येणार असल्याने वाहतूक प्रश्न निकाली निघणार आहे.आ. धनंजय मुंडे यांनी परळीकरांच्या जिव्हाळ्याचा बायपासचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला होता. बायपासच्या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून परळी बायपासचा प्रश्न रेंगाळत पडला होता. त्याला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे टेंडर काढून बायपास लवकरात लवकर तयार करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासचे काम सुरू झाल्यानंतर त्याला गती मिळेल, यात शंका नाही. बायपास पूर्ण झाल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून येणारी मोठी वाहने शहराच्या बाहेरुनच वळविली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न परळीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत परळी बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. १९ सप्टेंबर २०१३ रोजी हे काम सुरू करण्यासंदर्भात बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूमापन कार्यालयाने बायपास होणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचे आक्षेप मागविले होते. ज्या- ज्या शेतकऱ्यांचे आक्षेप प्रशासनाला प्राप्त झाले आहेत त्याचे निराकरण करण्यात आले आहे. भूमापन झाल्यानंतर आता भूसंपादनाचे काम ऐरणीवर येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया व प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे भूसंपादन कामास प्राधान्य दिल्यास हे काम एक महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु यावर पुन्हा कोणी आक्षेप घेतला तर हे काम रेंगाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.शहरात वाहतूक वाढलीपरळी शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढली आहे. वाहन खरेदी करणे सोपे झाले असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य झाले आहे. परिणामी, वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील काही भागातील रस्ते लहान आहेत. मोठे वाहन आले तर वाहतूक कोंडी होणे हा नित्याचा विषय ठरला आहे. मोंढा परिसरात असा एकही दिवस जात नाही की, वाहन कोंडी होत नाही. त्यामुळे बायपास तयार झाला तर शहरात होणारी वाहन कोंडी समस्या निकाली तर निघलेच शिवाय लहान-मोठे अपघात टळतील. (वार्ताहर)परळी शहरात वाहनांची संख्या वाढली मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे शहरात वाहनकोंडी झाली नित्याचीबायपासचे काम लवकर झाल्यास नागरिकांना मिळणार दिलासाबायपासमुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी वाहने बाहेरच वळणारभूसंपादनाचे काम आक्षेप न घेतल्यास लवकर पूर्ण होण्याची शक्यताबायपासच्या भूमापनाचे काम झाले पूर्ण