शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

टाळे लावा आंदोलन...!

By admin | Updated: June 7, 2017 00:24 IST

जालना : कर्जमाफी व शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचा दालनास टाळे लावण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कर्जमाफी व शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचा दालनास टाळे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तालुका पोलीस ठाण्यात आणले.शेतकरी संपास पाठिंबा म्हणून शासकीय व निमशासकीय कार्यालयांना टाळे लावण्याचा इशारा किसान क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील परिसरात सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साध्या वेशातील पोलीसह तैनात केले होते. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास किसान क्रांतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचले. बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले. घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना रोखले. जिल्हाधिकारी कार्यालसमोर घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या प्रशांत वाढेकर, देवकर्ण वाघ, अरविंद देशमुख, विष्णू मुळे, संदीप ताडगे, धनसिंग सूर्यवंशी, सुरेश गवळी, शिवाजी लकडे, महादेव कदम, देविदास जिगे, अंकुश लकडे, परम्ोश्वर गरबडे आदींना ताब्यात घेऊन पोलिसांनी तालुका ठाण्यात आणले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा ६९ प्रमाणे कारवाई करून सायंकाळी पाच वाजता सोडून देण्यात आले.