शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून एक लाखाचा ऐवज लंपास

By admin | Updated: June 23, 2014 00:27 IST

राजूर: येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन घरे फोडली. चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.२१ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली

राजूर: येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन घरे फोडली. चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि.२१ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी आलेले श्वान पथक माग न काढता तसेच परतले.याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजूर येथील श्रीकृष्णनगर भागात दिनकर कौतिकराव पुंगळे यांचे घर आहे. शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरटयांनी घराच्या भिंंतीवरून वाड्यात उडी मारुन घरात प्रवेश केला. दिनकर पुंगळे यांच्या तोंडावर दांड्याने जोराचा ठोसा मारून जखमी केले. तसेच चाकू व लाकडी दांड्याचा धाक दाखवून तुम्हारे पास जो है, वो जल्दीसे निकालके दो, नही तो जान से मार देंगे, असे म्हणून जबरदस्तीने कपाटात ठेवलेले ५० हजार रूपये रोख व पत्नीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने घेवून पोबारा केला. त्यांच्याच बाजूला राहात असलेले गजानन अंबादास पुंगळे यांच्या घरात प्रवेश करून १२ हजार रूपये रोख लंपास केले. त्यानंतर अशोक हिवराळे यांच्याकडे घरफोडी केली. घटनास्थळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, हसनाबाद ठाण्याचे स. पो. नि. शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळी जालन्याहून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. दि.२० रोजी रात्री राजुरेश्वर मंदिरासमोर असलेल्या नारळ प्रसादाची आठ दुकाने फोडून हजारो रूपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्याच दिवशी राजुरात जबरी चोरीचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अलिकडे राजुरात वाढत्या चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी चोरट्याविरूध्द हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हसनाबाद ठाण्याचे सपोनि बल्लाळ हे करीत आहे.