शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

कमला एकादशीला लाखो भाविक पैठणनगरीत

By admin | Updated: June 29, 2015 00:34 IST

पैठण : हिंदू पद्म पुराणानुसार पुरुषोत्तम (अधिक मास) महिन्यात येणाऱ्या कमला एकादशीचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता आज लाखो भाविकांनी पैठणनगरीत हजेरी लावली

पैठण : हिंदू पद्म पुराणानुसार पुरुषोत्तम (अधिक मास) महिन्यात येणाऱ्या कमला एकादशीचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता आज लाखो भाविकांनी पैठणनगरीत हजेरी लावली. धोंड्याच्या आजवरच्या वारीचा गर्दीचा विक्रम आज मोडीत निघाला. दिवसभरात जवळपास साडेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले अशी माहिती नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी दिली. विशेष म्हणजे भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज चुकल्याने सर्वच यंत्रणेवर आज दिवसभर ताण जाणवत होता .भगवान विष्णूंच्या साधनेचा काल हा पुरुषोत्तम मासात येणाऱ्या कमला एकादशीच्या मुहूर्तावर असतो व या एकादशीच्या मुहूर्तावर गंगास्नान, बत्ताशे व अनारसे दान व दीपदान यास विशेष महत्त्व असल्याचे पद्म पुराणात सांगण्यात आले असल्याचे सुयश शिवपुरी यांनी सांगितले. यामुळे पापनाश, विष्णू-लक्ष्मी कृपा व दारिद्र्य निवारण होऊन दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याने आज पहाटेपासून भाविकांची पैठणमध्ये रीघ लागली होती. गोदावरी नदीच्या कृष्णकमल व मोक्षघाटावर स्नानासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली. यामुळे घाटावरील व्यवस्था अपुरी पडली. गोदास्नानासाठीसुद्धा आज भाविकांना प्रतीक्षा करावी लागली. गोदेचे स्नान करून आज बत्तासे, अनारसे या गोड वस्तूंचे दान करून गंगेस दीप अर्पण करण्यात आले व नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन वारकरी परत जात होते. आजची वारी धोंड्याची वारी म्हणून प्रसिद्ध आहे. यासाठी लाखो भाविक आज दिंड्या घेऊन भानुदास एकनाथाचा गजर करीत नाथनगरीत दाखल झाले. भाविकांनी एकच गर्दी केल्याने सर्व यंत्रणेचे व्यवस्थापन आज वारंवार कोलमडून पडले. शहरात वारंवार वाहतूक जाम होत होती. बसस्थानकावरही बस गाठण्यासाठी व आलेल्या बसला स्थानकात जागा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. शहरात येणारे सर्वच रस्ते हाऊसफुल्ल झाल्याने मोठी तारांबळ उडत होती. पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे हे दिवसभर फिरून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. दरम्यान, आज आलेल्या भाविकांत महिलांची संख्या लक्षणीय होती. एकूण भाविकाच्या ७० टक्के महिला भाविक होत्या. मठ, मंदिरे हाऊसफुल्ल; नाथषष्ठीच वाटलीशहरातील सर्व धर्मशाळा, मठ, मंदिरे भाविकांच्या उपस्थितीने खचाखच भरली होती. दिवसभर भानुदास एकनाथाचा गजर करीत दिंड्यांसह वारकऱ्यांचे आगमन सुरू होते. रात्रभर मठात, मंदिरात थांबलेल्या वारकऱ्यांचे कीर्तन-प्रवचनाचे स्वर निनादत होते. हरिनामाच्या गजराने पैठणनगरी निनादून गेली. यामुळे नाथषष्ठीच्या वातावरणाची पैठणकरांना अनुभूती आली. पाकीटमारांची चांदीआज झालेली मंदिर परिसरातील गर्दी व मोठ्या श्रद्धेने आलेल्या महिला भाविकांना चोरट्यांनी चांगलाच फटका दिला. रविवारी १९ महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत व अनेक वारकऱ्यांच्या खिशाला चोरट्यांनी कात्री लावली. दिवसभर हे सत्र चालूच होते.