शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविक घृष्णेश्वरचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:14 IST

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री घृष्णेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवेरुळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री घृष्णेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतले.सोमवारी मध्यरात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक वेरुळमध्ये सोमवारी रात्रीपासूनच दाखल होत होते. दर्शनासाठी रात्रीपासूनच आज दिवसभर रांगा कायम होत्या. गतवर्षीच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी दिसून आली.भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत रहाटपाळणे, विविध साहित्यांची दुकाने व मनोरंजनाची साधने आली आहेत. घृष्णेश्वर महादेवाचा चांदीचा मुखवटा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता वाजतगाजत पालखीतून वेरुळ येथील शिवालय तीर्थकुंडावर अभिषेक करण्यासाठीसाठी नेण्यात आला. तेथे पुजारी व समस्त गावकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. हा क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविकांनी तीर्थकुंडावर मोठी गर्दी केली होती. तीर्थकुंडातील चलरूपी श्री घृष्णेश्वर महादेवाची पूजा संपल्यानंतर पालखी पुन्हा वाजतगाजत श्री घृष्णेश्वर मंदिरात नेण्यात आली.यावेळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दीपक शुक्ला, विश्वस्थ कमलाकर विटेकर, राजेंद्र कौशिके, संजय वैद्य, योगेश टोपरे, सुनील शास्त्री, चंद्रशेखर शेवाळे, शाम शेवाळे, सुनील विटेकर, मंगेश पैठणकर आदींनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, खासगी सुरक्षा रक्षक आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.तीन महिन्यांत बसस्थानक करू -दिवाकर रावतेराज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पहाटे श्री घृष्णेश्वरांचे दर्शन घेतले. पर्यटक आणि ग्रामस्थांच्या आग्रहास्तव वेरूळ येथे येत्या ३ महिन्यात बसस्थानक करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेक भाविकांचे मोबाईल, पर्स, मंगळसूत्र पळविले. परंतु ओरड झाल्यानंतर खुलताबादचे पोलीस निरीक्षक हरिश खेडकर यांनी चोरट्यांना लगेच पकडून भाविकांचे मोबाईल,पर्स, दागिने शहानिशा करून परत केले.