कुसळंब : संत वामनभाऊ यांच्या ४१ व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी तालुक्यातील गहिनीनाथ गडावर शुक्रवारी लाखो भाविकांनी हजेरी लावली. जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते.सकाळी संत वामनभाऊंच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर महंत विठ्ठल महाराज, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, उखळीकर महाराज, संजय वाघचौरे, दगडू बडे, रामकृष्ण बांगर, आ. मुरकूटे, माजी आ. साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, विजय गोल्हार, प्रा. सुशीला मोराळे यांची उपस्थिती होती.गडावर दर्शनासाठी दोन दिवसापासून राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. दोन ते तीन दिवस गडाकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.यावेळी गडावर महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (वार्ताहर)
गहिनीनाथ गडावर लाखो भाविकांची मांदियाळी
By admin | Updated: January 20, 2017 23:50 IST