शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जिल्ह्यात नुकसानग्रस्त लाखांत, तक्रारी केवळ ४ हजार ३३०

By | Updated: November 29, 2020 04:06 IST

औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील ...

औरंगाबाद : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. मात्र, सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसात सुमारे २ लाख ६५ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, ४ हजार ३३० शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत ऑनलाइन तक्रारी केल्या. त्यामुळे तक्रारींव्यतिरिक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जालना, बीड, औरंगाबाद या ३ जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहोचली असताना कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारी फक्त २० हजार ७२ आाहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५२ शेतकऱ्यांनी आपल्या ३ लाख ५६ हजार ८५७ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा ३६६ कोटी ८९ लाख ७८ हजार १६० रुपयांचा विमा हप्ता भरला. त्यामुळे १,२५१ कोटी ७३ हजार ७४६ रुपयांचे विमा संरक्षण मिळविले. बाधित शेतकऱ्यांकडून तक्रारी वेळेत होत नसल्याने कंपन्यांकडून नुकसानीचे दावे फेटाळले जातात, तसेच नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेलेल्या अहवालानुसार शासन मदतीचे वाटप सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.

((दोन स्वतंत्र चाैकटी))

७२ तासांत ऑनलाइन तक्रार करणे गरजेचे

पीकविम्यासाठी नुकसानीच्या तीन दिवसांत तक्रार कृषी विभाग किंवा विमा कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करणे गरजेचे असते. तक्रारींचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई विमा कंपनी देते, असे कृषी विभागाचे सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी सांगितले.

उशिरा तक्रारी विमा कंपन्यांनी नाकारल्या

१९ ऑक्टोबरपर्यंत केवळ जालना जिल्ह्यातून ऑफलाइन ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८,०१६ तक्रारींपैकी ३,३८१ तक्रारी उशिरा, १,२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी रिजेक्ट केल्या गेल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. विमा कंपन्यांकडून करण्यात आल्याची माहिती डाॅ. जाधव यांनी दिली.