औसा : बोअर पाडण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये घेऊन ये म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात पतीसह सातजणांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लातूर तालुक्यातील महापूर येथील गोविंद माने व अन्य सहाजणांनी संगणमत करून करणीधरणीच्या कारणावरून आणि चारित्र्यवर संशय घेऊन मीराबाई माने यांचा छळ करण्यास सुरुवात केली़ तसेच बोअर पाडण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून तिला उपाशीपोटी ठेवले़ शारीरिक व मानसिक छळ करीत तिला घराबाहेर हाकलून दिले़ याप्रकरणी मीराबाई माने यांच्या फिर्यादीवरून पती गोविंद माने व सासरच्या अन्य सहाजणांविरूद्ध औसा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ़ सोट करीत आहेत़(वार्ताहर)
लाखासाठी विवाहितेला घराबाहेर हाकलले
By admin | Updated: June 9, 2015 00:29 IST