शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

‘लई मजबूत भीमाचा किल्ला’

By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती मंगळवारी जिल्हाभरात उत्सवी वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने उस्मानाबादसह

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती मंगळवारी जिल्हाभरात उत्सवी वातावरणात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने उस्मानाबादसह गावागावांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. जयंतीनिमित्ताने उस्मानाबाद शहरातील डॉ. आंबेडकर पुतळा येथे भीमसैनिकांनी पहाटेपासूनच अभिवादनासाठी गर्दी केली होती. गर्दीचा ओघ दिवसभर कायम होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास भीमनगरसह शहराच्या विविध भागातून जंगी मिरवणुकांना प्रारंभ झाला. या मिरवणुकांमध्ये हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी तसेच विविध स्तरातील नागरीक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कळंब येथे डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अशीच झुंबड उडाली होती. जयंतीनिमित्ताने येथे राबविण्यात आलेल्या अन्नदानाच्या उपक्रमात सुमारे अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. भूम येथील भीमनगरमध्ये झेंडावंदन आणि सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. जयंतीनिमित्ताने परंडा रोडवरील गुलाब गरड यांच्या शॉपींग सेंटरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपींग सेंटर असे नाव देण्यात आले. परंडा येथे सर्व पक्षीयांतर्फे यंदा एकच जयंती साजरी करण्यात येत आहे. जयंतीनिमित्ताने शहरातील विविध भीमनगरात ध्वजारोहण तसेच सामूहिक वंदनेचा कार्यक्रम झाला. डॉ. आंबेडकर चौकात झालेल्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शहरवासियांसोबत ग्रामीण भागातूनही हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. उमरगा शहरातून चार जयंती मंडळांनी मंगळवारी मिरवणुका काढल्या. या मिरवणुकात तरुणांची संख्या लक्षणीय होती. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. लोहाऱ्यात जयंती उत्सव समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील मुख्य चौकात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विविध मंडळांसोबतच जिल्हाभरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयातही आंबेडकर जयंतीची धामधूम सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अरविंद लाटकर यांच्यासह अविनाश बोधवड, सचिन बारवकर उपस्थित होते.