शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी केला सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; तीनही आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 07:01 IST

छत्रपती संभाजीनगर हादरले, मुलाने दिली मृतदेहाची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जुन्या बीड बायपास रस्त्याने  चिकलठाण्याकडे घरी जात असलेल्या ३३ वर्षीय महिलेला रविवारी भरदुपारी तीन नराधमांनी उचलून नेत काटेरी झुडपात नेले. तेथे झाडाला तिचे हात बांधून आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली.

बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली. राहुल संजय जाधव (१९, रा. ऋषिकेशनगर, बकालवस्ती, चिकलठाणा), प्रीतम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४) आणि रवि रमेश गायकवाड (३४, दोघे रा. सदर) अशी अत्याचार करणाऱ्या  अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सिल्लोड तालुक्यातील एक कुटुंब विमानतळ परिसरात राहून मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करते. पती सकाळी मिस्तरी कामावर गेल्यानंतर पीडित संगीता (नाव बदललेले) मुलांना शाळेत सोडून त्या परिसरातील चर्चमध्ये दुपारी शाळा संपेपर्यंत प्रार्थना करीत असत. चर्चमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मुलांना घेऊन त्या रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गेल्या. मात्र, मासिक पाळी सुरू होऊन पोट दुखू लागल्यामुळे त्या मुलांना चर्चमध्ये थांबवून घराकडे निघाल्या. विमानतळाच्या भिंतीलगत वेड्या बाभळीच्या झाडांतून रस्त्याने त्या जात होत्या. तेथे नशा करीत बसलेल्या तीन आरोपींनी त्यांना अडविले. आरोपींनी मारहाण करून त्यांना उचलून वेड्या बाभळीमध्ये नेले. त्यांचे हात झाडाला बांधून आळीपाळीने  बलात्कार केला. त्यांच्या गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. अखेर, आरोपींनी तीक्ष्ण दगडाने ठेचून निर्घृण खून केला आणि ते निघून गेले.

मृतदेहाची माहिती मुलाने दिली

दुपारी संगीता यांचा लहान मुलगा घराकडे जाण्यास निघाला. रस्त्याने जाताना त्यास भिंतीलगत एक महिलेचा मृतदेह दिसला. त्याने घरी आल्यानंतर काहींना ही माहिती दिली. मात्र सगळ्यांनीच त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा त्याने सात वर्षांच्या मोठ्या भावाला सांगितले. त्याने चुलत्यास माहिती दिल्यानंतर त्यांनी इतरांसोबत धाव घेतली. तेव्हा माहिती देणाऱ्या मुलांचीच आई निघाल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटक