शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल पावणेचार लाख क्विंटल तुरीची आवक

By admin | Updated: March 18, 2017 23:48 IST

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडच्या हमीभाव केंद्रावर यंदा तब्बल पावणेचार लाख क्ंिवटल तुरीची आवक झाली आहे

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडच्या हमीभाव केंद्रावर यंदा तब्बल पावणेचार लाख क्ंिवटल तुरीची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही आवक दुप्पट असल्याचे सांगण्यात आले.येथील बाजार समितीत हंगाम सुरू झाल्यापासून १६ मार्च अखेर ३ लाख ८ हजार ९२३ क्विंटल तुरीची आवक झाली तर नाफेडकडे ६८ हजार ७२२ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून ३ लाख ७७ हजार ६३१ क्विंटल तूर आवक झाली. गतवर्षी सर्व हंगाम मिळून १ लाख ५५ हजार ३०८ क्विंटल तुरीची आवक झाली होती. यंदा भाव कमी असले तरी आवक मात्र दुपटीने वाढत आहे. नाफेडकडेही तब्बल ६८ हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. ही आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज नाफेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा नाफेडमध्ये ५०५० भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा नाफेडकडे वाढला आहे. परिणामी नाफेडमध्ये तूर खरेदीची प्रक्रिया ठप्प होत आहे. खाजगी व्यापारी तुरीला साडेतीन हजार ते साडेचार हजार रूपयांपर्यंत प्रति क्विंटलला भाव देत आहे. पैसे नगदी मिळत असल्याने काही शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांनाच तुरीची विक्री करीत आहेत. नाफेड केंद्राबाहरे अद्यापही शेकडो शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत. परिसरात ट्रॅक्टर, बैलगाडीने भरलेला आहे. गर्दी वाढत असल्याने नाफेडकडूनही खरेदीवर परिणाम होत आहे. ३१ मे पर्यंत नाफेड तूर खरेदी करणार असल्याचे सागण्यात येते. एकूणच यंदा नाफेडलाही तुरीमुळे सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)