शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनअभावी तिघांना इतरत्र हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

सोयगाव : जरंडी कोविड केंद्रातील १७ रुग्णांपैकी तिघांना अचानक अशक्तपणा जाणवल्याने तातडीने त्यांना पाचोरा (जि. जळगाव) येथील खासगी रुग्णालयात ...

सोयगाव : जरंडी कोविड केंद्रातील १७ रुग्णांपैकी तिघांना अचानक अशक्तपणा जाणवल्याने तातडीने त्यांना पाचोरा (जि. जळगाव) येथील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनच्या सुविधेसाठी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून सोयगाव तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नाही. सोयगाव कोविड केंद्राचे अद्यापही काम पूर्ण झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे कामही रेंगाळले आहे. त्यामुळे पुन्हा सोयगाव तालुक्याला ऑक्सिजनसाठी खासगी रुग्णालये जवळ करावी लागणार आहेत.

जरंडी कोविड केंद्रात १७ रुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी तिघांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ऑक्सिजनअभावी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे त्यांना इतरत्र हलविण्यात आले. सोयगाव केंद्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पासाठी ४२ लाखांचा निधी उभा केला आहे. मात्र, केंद्राचेच काम अपूर्ण असल्याने प्रकल्प उभारणीस अडचणी येत आहेत. तब्बल ९ महिन्यांपासून या केंद्राचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे जरंडीच्या कोविड केंद्रावरच रुग्णांचा भार आला आहे; परंतु त्या तुलनेत सुविधा नाही. ऑक्सिजनसाठी रुग्णांना औरंगाबादचे १२५ कि.मी.चे अंतर पार करावे लागते.

--------

दुसऱ्या लाटेत ५८ जणांचा मृत्यू

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सोयगाव तालुक्यात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तब्बल ३० रुग्णांना ऑक्सिजनअभावीच आपला जीव गमवावा लागला आहे; परंतु अद्यापही त्याअनुषंगाने कुठल्याच उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट धोक्याची घंटा ठरते की काय, अशी शंका आहे. सोयगाव तालुक्यातील १४ रुग्णांना जरंडीच्या कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.