शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औषधवैद्यकशास्त्र विभागातील अपघात विभागात स्वच्छतागृहाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:02 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या इमारतीत अपघात विभाग पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. मात्र, इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने ...

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या इमारतीत अपघात विभाग पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. मात्र, इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना डायपरचा वापर करावा लागतो तर येथील कोरोना रुग्णसेवेतील कर्मचारी, डाॅक्टर, परिचारिकांना इतर वाॅर्डांतील स्वच्छतागृहामध्ये जावे लागत असल्याने असुविधेला सामोरे जावे लागत आहे.

मेडिसीन इमारतीत १५ जानेवारीला पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अपघात विभाग रुग्ण सुविधेसाठी सुरु करण्यात आला. प्रत्यक्षात १२ व्हेंटिलेटर बेड आणि १६ बेड अशी २८ बेडची व्यवस्था असलेला सुसज्ज अपघात विभाग महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आला. इथे डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी, रुग्णांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. इथे चार ते पाच तासांपेक्षा अधिक काळ वाॅर्डात जागा उपलब्ध होईपर्यंत रुग्णांना थांबावे लागते. स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना डायपर लावावे लागतात. नाते‌वाईकांना डायपरचा भुर्दंड नाहक सोसावा लागत आहे. तर इथे एका शिफ्टमध्ये कार्यरत सुमारे १० डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांना इतर वाॅर्डात जाऊन स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे इथे स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी अशी मागणी कर्मचारी, नातेवाईकांतून होत आहे.

-

कॅज्युअल्टीत स्वच्छतागृह अपेक्षित नाही. मेडिसीन इमारतीत आतमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचा विचार होता. मात्र, तिथे योग्य जागा नाही. भविष्यातही हा अपघात विभाग सुरु ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर स्वच्छतागृहाची उभारणी करु.

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय