शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लाखो पतंगांची आकाशी झेप

By admin | Updated: January 15, 2016 23:56 IST

औरंगाबाद : मकरसंक्रांतीच्या पहाटेपासूनच शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली होती. लाखो पतंगांनी आकाश व्यापून टाकले होते.

औरंगाबाद : मकरसंक्रांतीच्या पहाटेपासूनच शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली होती. लाखो पतंगांनी आकाश व्यापून टाकले होते. ‘चल खिच... खिच... ए ढिल दे रे... कांटे, कांटे...’ असे आवाज ऐकू येत होते. अनेकांनी गच्चीवर डीजे लावले होते. ‘शांताबाई’च्या गाण्यावर आबालवृद्ध पतंगबाजी करीत होते. मागील आठवडाभरात शहरात तब्बल २० लाख पतंग विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यावरून पतंगशौकिनांचा उत्साह किती होता, हे लक्षात येते. संक्रांत आणि तीळगुळाचे नाते जितके घट्ट आहे, तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण पतंग उडविण्याचा आनंद या दिवशी घेत असतो. औरंगाबादेत दिवसभरात लाखो पतंग उडाले व कटलेही; पण पतंगबाजीचा खरा उत्साह जुन्या शहरातच होता. खासकरून औरंगपुरा, गुलमंडी, कुंभारवाडा, दलालवाडी, मछली खडक, अंगुरीबाग, धावणी मोहल्ला, खाराकुँआ, रंगारगल्ली, भांडीबाजार, कासारीबाजार, सराफा रोड, शहागंज, राजाबाजार, कँुवारफल्ली, जाधवमंडी, नबाबपुरा, किराणा चावडी, गांधीनगर, बंजारा कॉलनी या भागात लहान-थोर पतंग उडविताना दिसून आले. काही ठिकाणी राजकीय नेत्यांनीही खास पतंगबाजीचे आयोजन केले होते. अनेक कापड व्यापारी एकाच ठिकाणी पतंग उडविण्यासाठी जमले होते. चटपटीत चाट, हुरड्यापासून ते जेवणापर्यंतची व्यवस्था करण्यात आली होती. सिंधी कॉलनीतील मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आबालवृद्ध आनंद लुटताना दिसून आले.