शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत मजूर जागीच ठार

By admin | Updated: April 22, 2016 00:40 IST

गोरेगाव : धडकेत सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

गोरेगाव : कुल्फी विक्री करणाऱ्या एका वाहनाने दिलेल्या धडकेत सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाभूळगाव येथील गौतम कृष्णाजी कांबळे (वय ३५) हे रस्त्यावरून जात असताना मावाकुल्फी विक्री करणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच वाहनासह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची घटना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी मयताच्या कुटूंबियांना तसेच गोरेगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र एक ते दीड तास उशिराने बीट जमादार हे काही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिकासुद्धा घटनास्थळी दाखल झाली. परंतु ही रूग्णवाहिका असून शववाहिका नसल्याचे कारण देत थोडा वेळ थांबून रूग्णवाहिका रिकामी परतली. त्यातच बीट जमादार पांडे यांनी सुध्दा मयताच्या नातेवाईकांना शव गोरेगाव येथे घेवून या व पोलीस ठाण्यात फिर्याद द्या असे सांगत घटनास्थळाचा पंचनामा न करता काढता पाय घेतला. त्यानंतर बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी व मयताच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनाच्या व्यवस्थेसाठी जि.प. सदस्य अनिल पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता, पतंगे यांनी पाठविलेल्या वाहनामध्ये रात्री उशिरा १२ च्या सुमारास शव गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पंजाब कांबळे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)