शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बाजारातील ३० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

शिरूर अनंतपाळ : बोगस बी- बियाणे आणि खतांमुळे शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, म्हणून तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या

शिरूर अनंतपाळ : बोगस बी- बियाणे आणि खतांमुळे शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, म्हणून तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने खते आणि बियाणे यांच्या दुकानाची संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, ३० नमुने तपासणीसाठी गुणवत्ता प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तालुक्यातील विविध गावांत २४ पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्र आहेत़ खते, बियाणे त्याचबरोबर किटकनाशके यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यातून शेतकऱ्यांची फसगत होऊ नये यासाठी तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीने संयुक्त तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी डी.बी. सुतार आणि पंचायत समिती कृषी अधिकारी एस.बी. आडे यांनी सर्वच दुकानांतील नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. शहरासह तालुक्यातील दैठणा, साकोळ, येरोळ, उजेड, थेरगाव, हिप्पळगाव आदी गावांतील किटकनाशकाचे पाच, रासायनिक खताचे नऊ, तर बियाणाचे सोळा असे एकंदर तीस नमुने काढून परभणी आणि पुणे येथील गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.गुणवत्ता तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित स्वरुपाचा मिळाला तर संबंधित कंपनीच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे एस.बी. आडे यांनी सांगितले.