शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लेबर कॉलनीतील क्वॉर्टर्स करणार भुईसपाट...

By admin | Updated: May 20, 2016 00:36 IST

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरामध्ये मंत्रालयाच्या धर्तीवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही महिन्यांत इमारतीचा आराखडा, अंदाजपत्रक आणि पर्यायी जागेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची निश्चिती झाली आहे. त्यासाठी लेबर कॉलनीतील २५० क्वॉर्टर्स असलेल्या जागेवरील शासकीय क्वॉर्टर्स भुईसपाट करण्यात येणार आहेत. बांधकाम विभागाने क्वॉर्टर्समधील गाळेधारकांना १५ दिवसांत इमारत खाली करण्यासाठी नोटिसा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १९६१ मध्ये हे क्वॉर्टर बांधले असून, तेथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तेथील अनेकांनी क्वॉर्टरचा ताबा वेगवेगळ्या माध्यमातून स्वत:कडे ठेवला आहे. शासकीय जागा असल्यामुळे ती खाली करून घेण्याची तयारी विभागीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या मालकीचे उर्वरित क्वॉर्टरदेखील खाली करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व्हे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्यात त्या संकुलाच्या संभाव्य आराखड्यावर विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. जागतिक बँक प्रकल्पांतर्गत हे संकुल बांधण्यात येणार आहे. बांधकाम विभागाकडे त्यासाठी जबाबदारी देण्यात आली असून, महसूल विभागाच्या मदतीने क्वॉर्टर पाडले जाणार आहेत. भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तालय वगळता उर्वरित ४५ प्रशासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतींमध्ये आहेत. त्या इमारती कार्यालयासाठी पोषक नाहीत; परंतु एकत्रित इमारत नसल्यामुळे पर्याय म्हणून ही कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. मराठवाड्यात कॅबिनेटमंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, आयुक्त, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. मंत्रिमंडळ बैठक यंदा झाली नसली तरी २००९ पर्यंत ती सातत्याने होत गेली आहे. त्यामुळे विभागीय प्रशासकीय संकुलात मंत्रालयीन दर्जाचे बैठक सभागृह, सुसज्ज प्रशासकीय दालने, सर्व कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यासाठी संकुल उभारण्यात येणार आहे. १२ एकर जागा; ५० कोटींचा खर्चया प्रशासकीय संकुलासाठी १२ एकर जागा लागणार आहे. ५० कोटींच्या आसपासचा खर्च या संकुलावर होण्याची शक्यता आहे. लेबर कॉलनीतील शासकीय जागेवर हे संकुल बांधण्यात येणार असून, अंदाजपत्रकासाठी शासनाकडून मंजुरी घेण्यात येणार आहे. ३ वर्षांपर्यंतचा कालावधी हे संकुल बांधण्यासाठी लागेल. त्यासाठी तीन टप्पे करण्यात येतील. महत्त्वाकांक्षी आणि औरंगाबाद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे भव्य संकुल असावे. यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्यात आला आहे.