शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लेबर कॉलनीवरून सेना-भाजपात जुंपली

By admin | Updated: May 22, 2016 00:39 IST

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लेबर कॉलनी येथील शासकीय निवासस्थानांचा विषय मागील अनेक वर्षांपासून गाजत आहे.

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लेबर कॉलनी येथील शासकीय निवासस्थानांचा विषय मागील अनेक वर्षांपासून गाजत आहे. शासकीय पातळीवर या भागातील २५० घरे रिकामी करून जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. या हालचालींचा अचूक फायदा घेत अगोदर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बांधकाममंत्र्यांना निवेदन देऊन आघाडी घेतली. भाजपने या प्रकरणात उडी घेताच सेनाही मागे राहिली नाही. खा. चंद्रकांत खैरे यांनी लेबर कॉलनीत शनिवारी बैठक घेऊन भाजप नेत्यांना कॉलनीत येऊ देऊ नका, ते काही करू शकत नाही, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बैठकीतच कडाडून विरोध केला. लेबर कॉलनीच्या मुद्यावर सेना-भाजपने आपसात जोरदार चिखलफेक सुरू केली आहे.१९६० च्या दशकात लेबर कॉलनीत विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. असंख्य कर्मचाऱ्यांनी पन्नास वर्षांनंतरही शासकीय निवासस्थानाचा ताबा सोडला नाही. निवासस्थानांची जागा शासकीय असल्यामुळे ती खाली करून घेण्याची तयारी विभागीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. या जागेवर विभागीय प्रशासकीय संकुल उभारण्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने क्वॉर्टर्समधील नागरिकांना १५ दिवसांत इमारती खाली करण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत.दरम्यान, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी शुक्रवारी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन नागरिकांतर्फे निवेदन दिले. बांधकाममंत्री (पान २ वर)