येडशी : मागील भांडणाची कुरापत काढून माय-लेकास मारहाण झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.पोलिसांनी सांगितले की, येथील केशव अबा नगर भागात रमेश नागटिळक व त्यांच्या आईस मारहाण करण्यात आली. यावेळी अकरा जणांनी मिळून रमेश नागटीळक यास लोखंडी गजाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच रमेश यांच्या आईस एकाने तोडांवर बुक्की मारुन जखमी केले. या प्रकरणी रमेश नागटिळक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारुती जगताप, गणेश बेद्रे, बालाजी नागटीळक, गुलाब नागटीळक, मिनावती बेद्रे, मिरा जगातप, शारणबाई बेद्रे, वनमाला नागटीळक, मिटू जगताप, आशा जगताप, शुभम नागटीळक यांच्याविरुध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
कुरापत काढून दोघांना मारहाण
By admin | Updated: April 23, 2015 00:46 IST