शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने मारहाण केली; पतीस शिक्षा

By admin | Updated: September 5, 2016 01:02 IST

माजलगाव : पत्नी सासरी येत नसल्याच्या कारणावरुन पती दादाराव ऊर्फ अनिल उजगरे याने तिच्या डोके व हातावर कुऱ्हाडीने घाव घातले.

माजलगाव : पत्नी सासरी येत नसल्याच्या कारणावरुन पती दादाराव ऊर्फ अनिल उजगरे याने तिच्या डोके व हातावर कुऱ्हाडीने घाव घातले. याप्रकरणी पतीस माजलगाव सत्र न्यायालयाचे न्या.डी.जी. राजे यांनी तीन वर्षांची शिक्षा सुनावली.वडवणी येथील दादाराव ऊर्फ अनिल उजगरे याचे लग्न गावातील अनिता हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुखाचा होता; मात्र तीन वर्षांच्या कालावधीनंतर पती अनिल हा अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावरुन त्यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. संशयाच्या कारणावरुन अनिल तिला सतत मारहाण करू लागला. बहुतांश वेळा तिला उपाशीही ठेवत असे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अनिता ही वडवणी येथील वसंतराव नाईक चौकात असणाऱ्या माहेरच्या घरी २६ फेब्रुवारी २०१५ रोजी गेली. तिच्या पाठीमागे अनिल गेला. ‘तू नांदावयास नाही आल्यास, तुला जिवे मारीन’, अशी धमकी देत मारहाण केली. पतीच्या मारहाणीच्या भीतीने ती आईजवळच थांबली. ७ मार्च २०१५ रोजी अनिल हा कुऱ्हाड घेऊन आला व अनिताच्या डोक्यावर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. तिला तात्काळ बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. वडवणी पोलिसांनी दोषारोपपत्र माजलगाव सत्र न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी सरकारी वकिलांनी १० साक्षीदार तपासले. सरकारी वकील अ‍ॅड. रणजित वाघमारे यांचा युक्तिवाद मान्य करीत न्या. राजे यांनी आरोपी अनिल उजगरे यास ३९८ अ नुसार ३ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपये दंड सुनावला. अ‍ॅड. वाघमारे यांना अ‍ॅड. तांदळे, अ‍ॅड.बी.एस. राख यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)