शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजू लागले हिरवे स्वप्न!

By admin | Updated: June 24, 2017 00:24 IST

जालना : पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदीकरून उत्साहाने पेरणीची कामे सुरू केली. जमिनीत ओलावा असल्याने पिकांची उगवणही चांगली झाली. परंतु पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने कपाशीच्या झाडांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न कोमेजू लागले आहे. जिल्ह्यात यंदा सरासरी सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी नियोजन आहे. सुरुवातीला भोकरदन, बदनापूर, जालना तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व मका लागवड केली. कापसाची ४३, तर मका पिकाची २३ टक्के लावगड झाली आहे. बहुतांश भागात मूग, उडीद, सोयाबीन पेरणीही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७५ हजार हेक्टरवर खरिपाची ३० टक्के पेरणी पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र, गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ठिबक सिंचनवर कपाशी लागवड केलेले शेतक री थेंब, थेंब पाण्याचा काटकसरीने वापर करताना दिसत आहेत. तर ठिबकची सुविधा नसलेले जालना, भोकरदन, बदनापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी कपाशी पिकाला हाताने पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळचे ऊन आणि दुपारचे ढगाळ वातावरण पाहून आज पाऊस पडलेच, या आशेवर असलेले शेतकरी आता पेरणी वाया जाण्याच्या शक्यतेने चिंतातुर झाले आहेत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात अद्याप ७० टक्के क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नसल्याने मूग, उडिदाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.