बीड : गेल्या काही महिन्यांपूर्वी गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर तोफ डागून एमआयएमच्या आश्रयाला गेलेले माजी उपनगराध्यक्ष मोईन मास्टर शुक्रवारी स्वगृही परतले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत त्यांच्या पूनर्प्रवेशाचा सोहळा पार पडला.पालिका निवडणुकांच्या तोंडावर मास्टर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन डॉ. क्षीरसागर यांनी डॅमेज कंट्रोल केले आहे. डॉ. क्षीरसागर यांच्यावर आरोप करून डझनभर नगरसेवकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, डॉ. क्षीरसागरांवर आरोप करणाऱ्यांना एमआयएममध्ये मानसन्मान मिळाला नाही. त्यांनी झाले-गेले विसरून पुन्हा राकाँचा तंबू गाठल्याने क्षीरसागर यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. राकाँतून बाहेर पडलेले आणखी काही पुन्हा ‘घरवापसी’च्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. (प्रतिनिधी)
क्षीरसागरांचे ‘डॅमेज कंट्रोल’
By admin | Updated: October 22, 2016 00:26 IST